ED
ED Sakal
पुणे

पुणे : ताबुत इनाम इन्डॉमेंट ट्रस्टची साडेआठ कोटीच्या मालमत्ता "ईडी'कडून जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या इम्तियाज मोहम्मद प्रकरणामध्ये ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टच्या (टिआयईटी) बॅंक खात्यात जमा झालेली दिड कोटी रुपयांची रक्कम व सात कोटी 17 लाख रुपयांचे निवासी अपार्टमेंट अशी आठ कोटी 67 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनलयाने मंगळवारी जप्त केली.

"टिआयईटी' या ट्रस्टची बनावट कागदपत्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. त्याद्वारे "टिआयईटी' च्या जमीनीच्या संपादनाविरुद्ध 8 कोटी 67 कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रींग प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. त्यावरुन मुख्य आरोपी इम्तियाज मोहम्मद, हुसेन शेख, चांद रमजान मुलाणी, सतीश राजगुरु, संतोष कांबळे आणि इतरांनी संगनमत करुन फसवणुक केली होती. इशराक खान, झरीफ खान यांनी "टिआयईटी' ट्रस्टची बनावट कागदपत्रे बनविली होती. या बनावट कागदपत्रांद्वारे "टिआयईटी'चे विश्‍वस्त असल्याचे दाखवुन संबंधित पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन ट्रस्टच्या नावाने बॅंकेत खाते उघडले होते.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास "ईडी'कडे गेल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर या प्रकरणामध्ये ट्रस्टच्या बॅंक खात्यामध्ये जमा असलेली दिड कोटी रुपयांची रक्कम, तसेच निवासी सदनिका खरेदी करण्यासाठी आणि वैयक्तीक लाभासाठी बॅंक खात्यात रक्कम वळती केली होती. त्यानुसार, दिड कोटी रुपयांची रोख रक्कम व 7 कोटी 17 लाख रुपयांचे निवासी अपार्टमेंट "ईडी'ने तात्पुरत्या स्वरुपात जप्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT