पुणे

वीजजोड तोडल्याने डॉक्टरकडून साहय्यक अभियंत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

सागर शेलार

शिक्रापूर : वीजबील थकले म्हणून वीज मिटर बंद करणाऱ्या साहय्यक अभियंत्यासह शिकाऊ महिला तंत्रज्ञाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या एका डॉक्टरसह चौघांवर सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळीचा गुन्हा शिक्रापूर पोलिसांनी नुकताच दाखल केला. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या पुढील काळात कुणी आगळीक केल्यास आपण कठोरात कठोर पावले उचलणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (ता. २३) दुपारी एकच्या सुमारास येथील पाबळ चौकातील संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी महावितरणचे साहय्यक अभियंता गणेश वगरे व शिकाऊ महिला तंत्रज्ञ संगीता शालीकराम तरोने यांना डॉ. ज्ञानेश्वर टेमक, संजय गव्हाणे, गीतांजली संजय गव्हाणे व विनायक माणिक साबळे यांचेसह निळ्या टि शर्टात वावरत असलेल्या एका युवकाने वीज बील थकल्याने वीजजोड तोडणा-या सहायक अभियंता गणेश वगरे व शिकाऊ महिला तंत्रज्ञ संगीता शालीकराम तरोने यांचेसह वीज कर्मचा-यांना शिवीगाळ, मारहाण केली. यात संगीता तरोने यांचा मोबाईल हिसकावून फेकून देत त्यांचा हात पिरगळला. याबाबत वगरे यांच्या तक्रारीवरुन वरील चारही आरोपींवर शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, मारहाण आदी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

दरम्यान, थकलेल्या वीजबीलाच्या कारणाने वीजवितरण कर्मचा-यांना झालेली मारहाण याबाबत आपण गंभीरपणे या गुन्ह्याकडे पाहत असून, या पुढील काळात कुणाही शासकीय कर्मचारी-अधिकारी यांचेबाबतीत आगळीक केल्यास अशांविरोधात आपण कठोरात कठोर पावले उचलणार असल्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT