आळेफाटा (ता. जुन्नर) : पोलिसांच्या पथकाने अटक केलेले चोरटे. 
पुणे

एटीएम फोडणारे असे अडकले जाळ्यात

पिंपळवंडीतील येथील प्रकरणात आळेफाटा पोलिसांची नगरमध्ये कारवाई

सिद्धार्थ कसबे, पिंपळवंडी (ता. जुन्नर)

पिंपळवंडी : आळेफाटा (ता. जुन्नर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीम गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री चोरट्यांनी फोडून त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला होता. या चोरांना आळेफाटा पोलिसांनी रविवारी (ता. ९) रात्री गुरेवाडी (ता. पारनेर, जि. नगर) येथून अटक केली.

या गुन्ह्याच्या तपासासाठी एक पथक तयार केले होते. या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी गुरेवाडी येथील रहिवासी आहेत. तत्काळ या पथकाने तेथे जाऊन संशयित आरोपी राजेंद्र जाधव व कैलास काळे यांना अटक करून पोलिस ठाण्याला आणले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी एटीएम चोरीचा गुन्हा कबूल केला आहे.

राजेंद्र जाधव व कैलास काळे यांना न्यायलयात हजर केले असून, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी संतोष ऊर्फ विजय जाधव हा फरारी असून, त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.

या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर पवार, पोलिस नाईक नीलकंठ कारखेले, लहानू बांगर, पोलिस अंमलदार महेश काठमोरे, अवी वैद्य यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

SCROLL FOR NEXT