atyachar atyachar
पुणे

पुण्यातील महिलेवर बलात्कार; पतीपासून राहायची विभक्त

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पतीपासून विभक्त राहणाऱ्या (Separated from husband) महिलेवर शहरातील दोन प्रतिष्ठित व्यावसायिकांनी लैंगिक अत्याचार (Atrocities on women in Pune) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी व्यावसायिकांना अटक केली. भारत गांधी (५३, रा. एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ) आणि दिलीप ओसवाल (५३, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे (Accuse Areested) आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गांधी हा सोनार आहे. तर ओसवाल हा धान्याचा व्यापारी आहेत. कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपींनी लैंगिक छळ (Atrocities on women in Pune) केला. तसेच याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत महिलेने केला आहे. ही महिला एका खासगी कंपनीत कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते.

महिलेची ओसवाल या व्यापाराशी ओळख होती. महिलेचे पतीसोबत कौटुंबिक भांडण असून, ती त्याच्यासोबत राहत (Separated from husband) नाही. याचा फायदा दोन्ही आरोपींनी घेतला. त्यांनी तिच्याशी जवळीक वाढवली आणि वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०१८ च्या सुमारास तिच्यावर शिवाजीनगर येथील प्राईड हॉटेल, शुक्रवार पेठेतील फ्लॅट आणि आरोपीच्या कार्यालयात लैंगिक अत्याचार (Atrocities on women in Pune) केला.

आरोपींनी या कृत्यांचे सर्व प्रकारचे व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली (Accuse Areested) आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक भुजबळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT