ats sakal
पुणे

जुनेदच्या तपासात १५ फेसबुक खाती, 7 व्हॉटसअप खाती, ११ सिमकार्ड एटीएसला मिळाली

जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली होती.

सकाळ वृत्तसेवा

जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली होती.

पुणे - लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद महंमद याचा साथीदार आफताब हुसैन शाह (वय २८, रा. किश्‍तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मीर येथे अटक करण्यात आली होती. सदर दोघांना विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने जुनेद यास सात जून तर आफताब यास १४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. जुनेद याच्या पोलीस तपासात त्याचाकडे १५ फेसबुक खाती, सात व्हॉटसअप खाती आणि ११ सिमकार्ड मिळून आली आहे. सदर खात्यात शेकडो लोक सहभागी असून त्यांच्याकडे तपास कारवायांचा आहे अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे.

शाह हा जुनैद आणि लष्करे तैयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली. या तपास पथकाने श्रीनगरपासून २९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्‍तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT