attack on a builders office in Bhugaon by sharp weapon 
पुणे

भूगावमध्ये बिल्डरच्या कार्यालयावर कोयत्याने हल्ला

सकाळवृत्तसेवा

कोळवण(पुणे) : ''विकसन करार 50 टक्के भागीदारीचा असताना 60 टक्के हिस्सा द्या'' या वादातून भूगावमध्ये बिल्डरच्या कार्यालयावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार शनिवारी घडला. वैष्णवी डेव्हलपर्सचे बिल्डर्स धिरज काटे यांनी भागीदार अभिजीत तुकाराम मालुसरे यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे. 

भुगावमधील तांगडे वस्तीजवळील वैष्णवी डेव्हलपर्सचे कार्यालयामध्ये विकसन भागीदार अभिजीत तुकाराम मालुसरे व इतर दोन अनोळखी इसम बेकायदेशीरपणे कार्यालयात घुसुन इंजिनीयर संतोष बिरादार, सुपरवायझर महेश मांगले, सिक्युरीटी गार्ड अक्षय अडागळे, अनिता गिरी, मिरा केंदळे यांना मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून हातातील कोयत्याने ऑफीसच्या आतमधील काचेचा दरवाजा व ऑफीसच्या सर्व खिडक्या तोडुन फोडुन नुकसान केली असल्याची तक्रार पौड पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
अभिजीत मालुसरे यांच्याकडून 50-50 टक्का वैष्णवी डेव्हलपर्सने विकसन करारनामा करुन घेतला आहे. मात्र अभिजीत मालुसरे हा अधिक हव्यासापोटी मला 60 टक्के हिस्सा दया अशी बेकायदेशीर मागणी केली असल्याचा आरोप बिल्डर्स धिरज काटे यांनी केला आहे. परंतु आम्ही त्यास नकार दिल्यानंतर मालुसरे यांनी काम थांबवले होते. याबाबत पौड पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी डेव्हलपर्स अर्ज केेला होता. यावेळी हा अर्ज दिवाणी स्वरूपाचा असल्याचे सांगून पौड पोलिसांनी मालुसरे व काटे दोघांना समज दिली होती. 

विकसन करारनामा झाल्यानंतर मालुसरे यांची 10 गुंठे जागा खोदून वैष्णवी डेव्हलपर्स कार्यालय अभिजीत मालुसरे व त्यांच्या कुटंबियांच्या सहमतीने सुरू केले होते. 2018 मध्ये झालेल्या विकसन करारनुसार होते बांधकाम सुरू असल्याने स्टील व इतर साहित्य कार्यालयाचे आजुबाजुला टाकले आहे. शनिवारी मालुसरे यांनी बिल्डर्सच्या कार्यालयावर हल्ला केल्याने पोलिसांकडे वैष्णवी डेव्हलपर्सला धाव घ्यावी लागली. पौड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे

.आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT