पुणे

जेवणानंतर हात धुताना अंगावर पाणी उडाले; तरुणावर थेट वारच झाला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जेवण झाल्यानंतर हात धुताना अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन एकाने तरुणावर चाकूने वार केले. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीजवळ घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकास अटक केली आहे. 

शब्बीर सलामत शेख (वय 47, रा. औद्योगिक वसाहत गुलटेकडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रजत उर्फ धर्मा किशोर बाभुळकर (वय 24, रा. गुलटेकडी) याने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे ओळखीचे फिरोज वजीरखान पठाण यांच्या रिक्षामध्ये बसले होते. त्या वेळी त्यांच्या बाजुला असलेल्या त्यांच्या मित्रांनी फिर्यादी यांना त्यांच्यासमवेत दालचा राईस खाण्यासाठी बोलाविले. फिर्यादी हे त्यांच्यासमवेत जेवण करीत असताना शब्बीर शेख तेथे आला. शेख याने फिर्यादी यांच्याजवळच पाण्याच्या बाटलीतून पाणी ओतत हात धुऊ लागला. त्याचे पाणी फिर्यादी यांच्या अंगावर उडाले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याबाबत आरोपीकडे विचारणा केली. त्या वेळी शेख याने फिर्यादीस शिवीगाळ करत व जुन्या भांडणाचा राग मनात धरून रस्त्यावरील दगड फिर्यादी यांना फेकून मारून फिर्यादी यांच्या डाव्या पायाला दुखापत केली.

त्यानंतर शेख याने तेथील दुकानातून चाकू आणून फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या दंडावर वार केले. त्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. तसेच, साक्षीदार शहानूर अजीज शेख याच्यावरही चाकूने वार करून दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.के.रसाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT