attacked with a sharp weapon on bou in anger at donje pune 
पुणे

चेष्टा मस्करीत शिवीगाळ करणे बेतले जीवावर; तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

सकाळवृत्तसेवा

खडकवासला : डोणजे गावात सोमवारी रात्री फार्म हाऊसमध्ये दारू पिणे व जेवण करताना गावातील दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी सुरू असताना शिवीगाळ झाली. शिवीगाळीचा राग येऊन एका मित्राने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. दरम्यान, या घटनेचा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीशी काही संबंध नाही. असे हवेली पोलिसांनी स्पष्ट केले. 
 

शेखर दिलीप पारगे (वय 28, रा. डोणजे) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. शेखरने दिलेल्या तक्रारीनुसार सज्जक शेख याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. 

गावात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शेखरने सदस्य पदासाठी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. सोमवारी ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. त्याप्रक्रियेसाठी तो मित्र राकेश दराडे, रामदास हगवणे, मंगेश जाधव, रामदास उर्फ गोट्या मोरे (सर्वजण राहणार डोणजे) असे गाडीतून  स्वारगेट येथील निवडणूक कार्यालयात गेले होते. तेथे ११ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. आम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता गावात परतलो. संध्याकाळी ग्रामपंचायतीसमोर मित्रांच्या गप्पा सुरु होत्या. यावेळी, माझी बिनविरोध सदस्य निवड झाल्यामुळे रात्री आठ वाजता वरील मित्र येथील दुकानातून चिकन, व पुण्यातून आणलेली दारू घेऊन आम्ही जेवण करण्यासाठी आतकरवाडीतील फार्म हाऊसवर गेले. जेवण करण्यास सांगून दारू पित होते. त्यांच्या अगोदर गावातीलच ओळखीचे सज्जक शेख, शाकीर शेख, ऋषिकेश तांबे व एक पाहुणा (नाव माहित नाही) असे बाजूला दुसऱ्या टेबलवर बसले होते. नंतर गावातील ओळखीचे असल्याने ते एकत्र आले. तेव्हा चेष्टा-मस्करी सुरू असताना सज्जदने शिवी दिली. त्यावरून शेखर व सज्जकमध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. दोघांना सोबत असलेल्या इतर मित्रांनी बाजूला घेतले समजावले. तेथून सज्जक रागाने निघून गेला. त्यानंतर आम्ही सर्वजण समोर गार्डनमध्ये उभे राहिलो शाकीर शेख व ऋषिकेश तांबे, जाऊदे विशेष सोडून दे असे बोलत असताना शेखर व ऋषिकेश तांब्याची बाचाबाची झाली. तेव्हा १५-२० मिनिटांनी सज्जक शेख फार्महाऊसवर आला. तेव्हा तो हात पाठीमागे ठेवून चालत आला. तो शेखरजवळ आला. आणि शाकीरने शेखरला पाठीमागून धरले. सज्जकने धारदार हत्याराने शेखरच्या डोक्यावर डाव्या बाजूस वार केला. वार अडविण्यासाठी शेखरने हात वर केल्याने हाताच्या बोटावर तसेच दोन्ही दंडाला जखम झाली आहे. त्यावेळी रात्री साडेअकरा वाजले होते. तेवढ्यात, शेखरचा मित्र राकेशने सज्जकला धरले. शाकिर, तांबे व त्याचे सोबतच्या पाहुण्यांनी तुषारला लाथाबुक्क्यांनी खाली पाडून मारहाण केली. भांडणात राकेश गराडे मधे आल्याने ते त्याचे मोटरसायकलवरून पळून गेले. राकेश यांनी महेश पारगे व गणेश पारगे यांना फोन करून बोलावून घेऊन त्याच्या गाडीतून त्यांनी शेखरला उपचारासाठी पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, डोणजे गावाची ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. या घटनेची निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.  अशी माहिती पोलिसांनी सदाशिव शेलार यांनी दिली.यासंदर्भात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Windows 10 : ऑक्टोबर महिन्यांपासून बंद होणार विंडोज 10 चा फ्री सपोर्ट; लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात, आता काय करावं? जाणून घ्या

Fake Massege Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची बनावट मेसेजद्वारे फसवणूक, अब्दुललाटच्या दोघांवर गुन्हा; का आहे नेमकं प्रकरण?

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

SCROLL FOR NEXT