attacked on society member by sharp weapon due to dispute of parking at ghorpade peth of pune 
पुणे

पार्कींगवरुन सोसायटीच्या बैठकीत राडा; सभासदावर धारदार शस्त्राने वार

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : सोसायटीच्या बैठकीत खराब दुचाकी अन्यत्र लावण्यास सांगितल्याच्या रागातून एका सभासदाला दुसऱ्या सभासदावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. याबरोबरच अन्य साथीदारांनी सर्व सभासदांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर दगडफेक केली. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता घोरपडे पेठेतील क्‍लास गार्डन सोसायटीमध्ये घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फैसल मुजाहीद (वय 35, रा. क्‍लास गार्डन सोसायटी, घोरपडे पेठ) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर हबीब वाबर शेख (वय 42), इम्रान इलाही शेख (वय 20) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. अन्य बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता पीएमपी राबविणार दर महिन्याला 'बस डे`

पोलिस उपनिरीक्षक जे.डी.हंचाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघेही घोरपडे पेठेतील क्‍लास गार्डन सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. मंगळवारी रात्री सोसायटीमध्ये पार्कींगसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी फिर्यादी यांनी हबीब यास त्याची खराब झालेली दुचाकी पार्कींगला अडथळा ठरत असल्यामुळे ती पाण्याच्या टाकीवर लावण्यास सांगितली. त्याचा राग आल्याने हबीबने फिर्यादीस बैठकीतच शिवीगाळ करीत त्यांना खुर्ची फेकून मारली. त्याचवेळी हबीबचा पुतण्या इम्रानेने धावत घरी जाऊन धारदार शस्त्र आणले. इम्रानने ते हत्यार त्याच्या वडीलाकडे दिले. त्यानंतर इम्रानच्या वडीलाने फिर्यादीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले.

आई रागावली म्हणून 12 वर्षीय मुलगी घर सोडून गेली अन् एका आजीने तिला...

या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यानंतरही हबीब याने बाहेरील 12-13 जणांना बोलाविले. त्यांनी फिर्यादी व अन्य सभादसांवर दगड फेकून मारले. या घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी फिर्यादीस उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT