Court Sakal
पुणे

पुणे : भक्कम पुरावे नसतानाही हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

शुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे नसताना जखमी व्यक्तीची साक्ष

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावे नसताना जखमी व्यक्तीची साक्ष आणि सरकारी वकिलांनी (government prosecutors) केलेला युक्तिवाद या आधारावर न्यायालयाने हल्लेखोराला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश (Judge) ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला.

सुभाष पांडुरंग कड (वय ३३, रा. दरेकरवाडी, ता. शिरूर, सध्या रा. खेड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. १२ मे २०१२ रोजी शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी येथे हा प्रकार घडला होता. कड याने केलेल्या जीव घेण्या हल्ल्यात शंकर दत्तात्रेय दरेकर जखमी झाले होते. याप्रकरणी, सागर शिवाजी दरेकर (वय २०, रा. दरेकरवाडी, शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. दरेकर यांनी कड यास आपली बहिण कोठे असल्याची विचारणा केली होती. याकारणावरून कड याने चाकूने व त्याच्या साथीदाराने काठ्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात तिघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने तपास झाल्याचे नमूद करीत ॲड. कावेडिया यांनी न्यायालयास अर्ज देऊन जखमी व्यक्तीला न्यायालयात बोलावून घेतले. त्याची तपासणी केल्यानंतर न्यायालयात त्याची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र खटला सुरू होईपर्यंत दरेकर यांचा जबाब न्यायालयापुढे आला नव्हता. तसेच, गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार व आरोपीने घटनेवेळी घातलेले कपडे जप्त केले नाही. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने तपास होत असेल तर त्याचा फायदा आरोपींना होईल. या स्वरूपाच्या घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे न्यायालयाने उपलब्ध असलेल्या पुराव्यांआधारे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.जखमी व्यक्तीचा जबाब का नोंदविण्यात आला नाही? यावर तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयापुढे कोणतेही कारण सांगता आले नाही. तसेच हत्यार जप्त का केले नाही? याचेही कारण पोलिसांना सांगता आले नाही, अशी माहिती ॲड. कावेडिया यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT