Attempt to hack Pune mayor mail Nigerian fraud exposed
Attempt to hack Pune mayor mail Nigerian fraud exposed 
पुणे

पुण्याच्या महापौरांचे ई-मेल हॅक करण्याचा प्रयत्न; नाजेरियन फ्रॉड उघडकीस

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सतर्कतेमुळे नायजेरियन फ्रॉडची बाब उजेडात आली आहे. मोहोळ यांचे बँक अकाऊंट बनवाट इमेलद्वारे हॅक करण्याचा प्रयत्न झाला असून सायबर पोलिसांकडून तक्रार करण्यात येणार आहे.  

हेही वाचा :  पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के

महापौर मोहोळ यांच्या महापालिकेच्या अधिकृत इमेल आयडीवर 2 नोव्हेंबरला एक मेल आला होता. यामध्ये, ''तुम्हाला फॉरेन कॉन्टॅक्टर म्हणून देय रक्कम मिळाली की नाही याची खात्री करण्यासाठी ई-मेल पाठवीत आहोत. ही रक्कम मिळाली नसल्यास मेलला रिप्लाय करा. '' फंड टु एटीएम' या कॅश पेमेटसाठी पुर्ण नाव, कॉन्टॅक्ट नंबर, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स पाठवा असे ई-मेल मध्ये म्हंटले होते.

फेडरल गव्हरमेंट आणि सेंट्रल बँकेच्या नावाचाही उल्लेख केला असून मेहमूद बुरानी या व्यक्तीच्या नावे आला आहे. (Federal Government of Nigeria)'एफजीएन एटीएम'चा सोप्क्सपर्सन असल्याचे मेलमध्ये नमूद केले आहे. महापौर मोहोळ यांना हा मेल फ्रॉड असल्याची शंका आली. त्यांनी या मेलला रिप्लाय न देण्याच्या सुचना दिल्या आणि तातडीने संबधित प्रकार पुणे पोलिसांच्या सायबर सेलला कळविलला. महापौरांच्या सतर्तकेमुळे नाजेरीयन फ्रॉड असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, या प्रकारामुळे सायबर क्राईमबाबत नागरिकांच्या मनात असुरक्षिता वाढत आहे. 

हेही वाचा : पीएमपीच्या ६० टक्के बस मार्गांवर; रोजचे एवढे प्रवासी करतात प्रवास

''कंत्राटदार म्हणून देय रक्कम पाठविणे आणि एटीएमसंदर्भात माझ्या पालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल आला. हा प्रकार नायजेरियन फ्रॉडचा असून खाते हॅक करण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून तपासाची मागणी केली आहे. नागरिकांनीही ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घ्यावी.'' -  मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT