माळेगाव (पुणे) : बारामती तालुक्यातील शिरवली येथील विजय रेस्टॉरंटमध्ये रविवार (ता. १४) जेवण न दिल्याच्या कारणावरून आचारी दीपक शहा व वेटर यांना काही मद्यपी प्रवाशांनी तलवार व काठीच्या साह्याने मारहाण केली. तसेच, रेस्टॉरंटमधील वस्तूंची तोडफोड करून मोठे नुकसान केले.
याप्रकरणी वेटर राहुल बाळासाहेब थोरात (वय 35, रा. शिरवली, ता.बारामती) यांनी तालुका पोलिस ठाण्यात पंधरा लोकांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार, आचारी दीपक शहा यांना दमदाटी करून काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले आहे. आरोपी सागर संभाजी निंबाळकर याने कुठे गेला आहे तुझा मालक ? त्याला व तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून आचारी दीपक शहा यांच्या डोक्याला धारदार शास्त्राच्या सह्याने ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच, हॉटेल काउंटरमधील दहा हजार रुपयांची रोकड व सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल संबंधित आरोपींनी पळून नेला.
पोलिसांनी उपलब्ध फिर्याद व जखमींचा वैद्यकीय अहवालाच्या आधारे पंधरा मद्यपी प्रवाशांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींमध्ये स्वप्निल रमेश निकम, सागर संभाजी निंबाळकर, अविनाश कैलास निंबाळकर, अभिजीत भानुदास निर्मळ, अक्षय भरत माने, लखन सावळाराम बरकडे, राज्यात राजेंद्र निंबाळकर, स्वप्निल रमेश निंबाळकर, माउली बनकर, अक्षय जगताप, सोनू भोईटे, किशोर पांढरे, रणजीत निंबाळकर, संग्राम मोहिते, रोहित मोहिते (सर्व रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.