Attempting to kill by attacked with Sharp weapon to the tempo driver Pune 
पुणे

'तुझी सुपारी दिली होती, कसा वाचलास'' म्हणत टेम्पोचालकास अडवून केला कोयत्याने वार

जुन्या भांडणाच्या रागातून टेम्पोचालकावर कोयत्याने वार

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून टेम्पोचालकास अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता लोहगाव परिसरात घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात एका व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितम जाधव (वय 24, रा.लोहगाव) असे या घटनेत जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायकोवर बलात्कार आणि 20 लाखाची खंडणी; काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे शनिवारी सकाळी त्यांच्या टेम्पोमध्ये माल भरुन लोहगावमधून भुकुम वस्तीकडे जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने जाधव यांचा टेम्पो अडविला. त्यानंतर त्यांना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केला.

"तुला आता संपवुन टाकतो, तुझी सुपारी दिली होती, तु कसा वाचलास" अशी धमकी देत आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर वार केले. या घटनेनंतर फिर्यादी तेथून पळून जात होते, त्यावेळी आरोपीने त्यांचा पाठलाग करुन फिर्यादीच्या कमरेवर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुकक्यानी जबर मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आर.ए.पाटील करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT