ranjangav 
पुणे

रांजणगावच्या महागणपतीला चतुर्थीनिमित्त आकर्षक सुवर्ण अलंकार 

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : अष्टविनायकांतील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील महागणपतीच्या मूर्तीला आज संकष्ट चतुर्थीनिमित्त आकर्षक पोशाख व सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले.

अष्टविनायक महागणपतीला आज संकष्ट चतुर्थी निमित्तश्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे पहाटे अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. दुपारी महागणपतीची महापूजा करून महानैवेद्य करण्यात आला. 

अमोल कोल्हे म्हणतात, कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवली पाहिजे
 
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर, उपाध्यक्ष नारायण पाचुंदकर, सचिव संतोष दुंडे, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी व  मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. 

दरम्यान, चतुर्थीनिमित्त येथील प्रगतशील शेतकरी नानाभाऊ पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मंदिर गाभारा व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच, ट्रस्टतर्फे महागणपतीच्या मूर्तीला आकर्षक पोशाख व सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आला होता. महागणपतीचे हे मनमोहक व आकर्षक रूप ऑनलाइन व सोशल मीडियावर पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना विषाणूचा प्रसार  व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून "श्रीं"ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. सोमवारी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी मंदिर खुले करणार की नाहीस याविषयी ट्रस्टकडे अनेक नागरिकांनी फोनवरून विचारणा केली. मात्र, शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन केले जात असून, शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंदच राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT