Drama
Drama 
पुणे

लॉकडाउनमुळे 'ओटीटी’ला प्रेक्षकांची पसंती

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक वापरात आलेले मनोरंजन माध्यम म्हणजे ‘ओव्हर दी टॉप’ मीडिया सर्व्हिसेस अर्थात ओटीटी! प्रेक्षकांना मनोरंजनाचे एक खुले माध्यम प्राप्त झाले, त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील कसदार अभिनेते आणि दर्जेदार संहितांना एक व्यासपीठ मिळाले. लॉकडाउनमुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘लॉक’ झाल्यामुळे घरात बसून कुटुंबासोबत मनोरंजनाचा चौरस आनंद देणारे ओटीटी आता प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे वर्षभरात मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये आणि प्रेक्षकांच्या सवयींमध्ये झालेला बदल पडताळण्यासाठी ‘सकाळ’ने नागरिकांशी संवाद साधला. २४ वर्षांची तरुणी हिदा नायर सांगते, टीव्हीवर दाखविण्यात येणारी मालिका ही वर्षानुवर्षे चालते, त्यात कोणतेही तथ्य नसते. मात्र ओटीटीवर विविध प्रकारचा साठा उपलब्ध आहे. त्यावर असलेले वेबसिरीज हे काही भागांचेच असतात व त्यामध्ये समाजातील वास्तविकता मांडली जाते. त्यामुळे ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.’

काय परिणाम झाला?

  • नव्या चित्रपटांचे, मालिकांचे चित्रीकरण थांबले 
  • नाट्यगृहे बंद केल्यामुळे अभिनेत्यांसह पडद्यामागचे कलाकार, कामगार बेरोजगार झाले 
  • या क्षेत्राशी निगडित असंख्य लोकांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले 
  • काही मालिका बंद पडल्या 
  • काही कलाकारांनी अक्षरशः हाताला मिळेल ते काम केले 

सद्य:स्थिती

  • महिन्याभराचे किंवा वर्षभराचे सबस्क्रिप्शनमुळे मनोरंजनाचा हा पर्याय अजूनही लोकांच्या पसंतीचा. 
  • नवे किंवा जुने चित्रपट ओटीटीवर सहज उपलब्ध असल्यामुळे कधीही, कुठेही पाहिले जातात. 
  • घरातही टीव्हीवर ओटीटीच्या माध्यमातून मालिका किंवा चित्रपट पाहण्याची क्रेझ. 
  • टीव्हीचे रिचार्ज मारण्याऐवजी ओटीटी सबस्क्रिप्शनला प्राधान्य. 
  • इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. 

ओटीटीचा पूर्वी जास्त वापर करत नव्हतो. कोणताही नवीन चित्रपट पाहण्यासाठी आम्ही थिएटरला जात होतो. मात्र, लॉकडाउननंतर ओटीटीचा वापर वाढला आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन यांसारखे विविध सबस्क्रिप्शन घेतले आहेत व टीव्हीवर तेच पाहतो. ओटीटीवर फक्त भारतीय नाही, तर परदेशातील कंटेन्टसुद्धा उपलब्ध आहेत. 
- राहुल बोकील, ओटीटी वापरकर्ते 

ओटीटीमुळे नाटकांवर परिणाम होणार नाही. प्रेक्षकांना नाटक प्रत्यक्षात पाहायला जास्त आवडते. सध्या कोरोनामुळे नाटकांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही पण ओटीटीसाठी लेखन, दिग्दर्शन करण्याची संधी कलाकारांना मिळाल्यास नक्कीच हा सुद्धा उत्पन्नाचे चांगले माध्यम ठरू शकेल.
- श्रीकांत प्रभाकर, नाटक दिग्दर्शक

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT