Theater Sakal
पुणे

प्रेक्षकांची चित्रपटगृहांकडे पाठ

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ‘ओमिक्रॉन’मुळे बाधितांची संख्या वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ‘ओमिक्रॉन’मुळे बाधितांची संख्या वाढत आहे.

पुणे - देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट असलेल्या ‘ओमिक्रॉन’मुळे (Omicron) बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका (Infection Danger) टाळण्यासाठी देशातील ६० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी पुढील ६० दिवसांत चित्रपटगृहे (Theater) किंवा मल्टिप्लेक्सला (Multiflex) भेट देणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. ही बाब नुकतीच एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

कोरोनाचा धोका अद्याप कमी झाला नसून ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच आढावा घेण्यासाठी ‘लोकल सर्कल्स’च्या वतीने देशातील ३१४ जिल्ह्यांतील नागरिकांचे मत जाणून घेण्यात आले.

त्यात १६ हजार नागरिकांनी सहभाग घेतला. त्यातील ६२ टक्के पुरुष तर ३८ टक्के महिला आहेत. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार गेल्या वर्षीपासून बंद असलेले चित्रपटगृह व नाट्यगृहांना उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु संसर्गाची भीती असल्याने आता नागरिकांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तर केवळ १४ टक्के नागरिकांनी चित्रपटगृह किंवा मल्टिप्लेक्समध्ये जाण्याचे मत व्यक्त केले आहे.

अहवालातील महत्त्वाच्या बाबी

  • जुलै २०२१ च्या तुलनेत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ

  • ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्याने मल्टिप्लेक्समध्ये जाणे धोक्याचे

  • एकूण ६२ टक्के नागरिकांची मनोरंजनाच्या साधनांकडे पाठ

  • चित्रपटगृहांमध्ये मास्क वापर टाळण्याची शक्यता अधिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT