Land Acquisition sakal
पुणे

Land Acquisition : बोपोडीत महानगरपालिकेची भूसंपादन कारवाई

जुना मुंबई-पुणे रस्ता रूंदीकरणासाठी आज गुरूवार (ता. २५) रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

औंध - जुना मुंबई-पुणे रस्ता रूंदीकरणासाठी आज गुरूवार (ता. २५) रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ६३ मालमत्ता ताब्यात घेवून जमीनदोस्त करण्यात आल्या. एकूण ४९७९ चौरस मीटर क्षेत्रफळावर हि भूसंपादन कारवाई करण्यात आली.

२०१८ पासून रस्ता रुंदीकरणासंदर्भात या ठिकाणचे भूसंपादन प्रलंबित होते. या कारवाईमध्ये ५० अधिकारी व ७५ मजूर सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे ५ पोलिस निरीक्षक आणि २५ अधिका-यांसह सुमारे ४५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपायुक्त महेश पाटील, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, विशेष भूसंपादन अधिकारी शेंडगे, नगरनियोजनच्या सहायक शीतल भिंगारदिवे, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.

४ प्रकरणांमध्ये महानगरपालिकेच्या विरूध्द जे दावे होते त्या दाव्यांचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागलेला आहे. लवकरच या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT