Aundh-ITI 
पुणे

पुणे विभागात औंध आयटीआय उत्कृष्ट

सकाळवृत्तसेवा

औंध - राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नुकताच जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.यामध्ये औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट प्रशिक्षणासह गुणवत्तेसाठी पुणे विभागातील उत्कृष्ट आयटीआय म्हणून सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पध्दतीने आयोजित या कार्यक्रमात  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच जुलै २०१९मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत विविध व्यवसायातून राज्यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या औंध आयटीआय मधील प्रशिक्षणार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. संस्थेचे माजी प्रशिक्षणार्थी व सध्या वार्षिक ऐंशी कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील नामवंत उद्योजक शंकर कुंडलिक गायकवाड यांनाही या कार्यक्रमात पुणे विभागातून उत्कृष्ट कामगिरीबद्दल राॅकस्टार म्हणुन सन्मानित करण्यात आले.

संस्थेची उद्दिष्ट्ये पर्यायाने पुणे विभागाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी सँडविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड, मारुती सुझुकी लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड, सिंडलर लिमिटेड यासह इतर काही औद्योगिक आस्थापनांनाही सन्मानित करण्यात आले. टाटा मोटर्स लिमिटेड यांच्याद्वारे औंध आयटीआयमध्ये प्रशिक्षणार्थींचे कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी अॅसेंब्ली शॉपसाठी अत्याधुनिक कार्यशाळा विकसित करण्यात आली असून या कार्यशाळेत प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

सॅन्डविक एशिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने संस्थेत स्वतंत्र व अद्यावत मशीन शॉपची उभारणी करून याठिकाणी प्रशिक्षणार्थी व निदेशकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. मारुती सुझुकी लिमिटेड यांच्या सहयोगाने अत्याधुनिक यंत्रसामुग्री व वाहन उपलब्ध करून देऊन आयटीआय मधील कार्यशाळेचे आधुनिकीकरण केले आहे. सिंडलर लिमिटेड यांच्याकडून आरओ प्लँटची उभारणी करून संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वरील औद्योगिक आस्थापनांच्या मदतीने व संस्थेचे प्राचार्य प्रकाश सायगावकर यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण व नाविन्यपूर्ण कार्य केल्याबद्दल पुणे विभागातील उत्कृष्ट सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT