Aunty arrested for trying white slavery to her niece 
पुणे

भाचीलाच वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या मावशीला अटक; कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तारांबळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमध्ये मावशीकडे राहण्यासाठी पाठविलेल्या अल्पवयीन मुलीला 
वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या मावशीसह तिच्या प्रियकराला कोंढवा पोलिसांनी अटक केली. हांडेवाडी परिसरात हि धक्कादायक घटना घडली. दरम्यान, संशयित आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.याप्रकरणी मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन 25 वर्षीय महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कासेवाडी परिसरात राहतात. तर त्यांची घटस्फोटीत बहिण हांडेवाडी येथे राहात होती. फिर्यादी यांनी लॉकडाऊनमध्ये त्यांच्या तीन मावशीकडे राहण्यासाठी पाठविले होते. सुरुवातीचे दोन ते तीन आठवडे मावशी अल्पवयीन मुलीसह तिच्या भावंडाशी चांगले वागली. त्यानंतर तिने अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय केल्यानंतर भरपुर पैसे मिळतील, असे सांगितले. याबरोबरच मावशी व तिचा प्रियकर तिच्याशी अश्लिल बोलून तिला अश्लील व्हिडिओ दाखवित होते. दरम्यान, मुलीने आरडा-ओरडा केल्यानंतर तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्या लहान बहिण भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.  हा सर्व प्रकार मुलीने आईकडे आल्यानंतर तिला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. 

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपीना अटक केली. त्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली. त्यावेळी ते दोघेही पोझिटिव्ह आले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर त्यांना तत्काळ ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT