Aurangabad Municipal Corporation comes to power we will give resolution of Sambhajinagar said Chandrakant Patil 
पुणे

औरंगाबाद महापालिकेत सत्ता आली तर संभाजीनगरचा ठराव देऊ : चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

पुणे : "औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेसचे मतपरिवर्तन करून पुन्हा नव्याने ठराव पाठवावा.' असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या मित्र असलेल्या शिवसेनेला सोमवारी दिला. " औरंगाबाद महापालिकेत आमची सत्ता आली, तर नामांतराचा पहिला ठराव करून पाठवू,' असेही पाटील म्हणाले. 

कोथरूड विधानसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले होते. आता पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागेल. महापालिकेत ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचेही ते म्हणाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परप्रांतीयांबाबतची भूमिका स्पष्ट करावी : चंद्रकांत पाटील 
आगामी महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या पातळीवर कोणतीही चर्चा नाही. परंतु युती करण्यापुर्वी परराज्यातून आलेल्या परप्रांतीयांबद्दलची भुमिका मनसे स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ऐतिहासिक निर्णय! सातारा जिल्ह्यातील धोम धरणग्रस्त २९ गावांना मोठा दिलासा; पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी

२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी; केतन अग्रवाल प्रकरणामुळे घटनास्थळ ठरतंय आकर्षण

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

SCROLL FOR NEXT