available Adequate supply of oxygen to fight corona 
पुणे

कोरोनाशी लढण्यासाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सध्या 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून, उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्यात आली. बैठकीला औषध विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील, औषध निरीक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या. पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. तसेच, अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, जेणेकरुन भविष्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. बैठकीत उत्पादक व पुरवठादारांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत डॉ. देशमुख यांनी चर्चा केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


कर्मचारी आणि टॅंकर चालकांनाही लस

ऑक्सिजन निर्मिती कारखान्यात असलेले कर्मचारी आणि टँकर चालक यांना लस उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन उत्पादकांनी केले. त्यावर लस उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. उत्पादक व पुरवठादारांना काही अडचण भासल्यास औषध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त सुरेश पाटील यांनी या वेळी केले.

दारु पिण्यासाठी २१ वर्षांची अट, दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT