Aviation Gallery Vishwa sakal
पुणे

Aviation Gallery Vishwa : उन्हाळी सुट्टीतच ‘एव्हिएशन विश्‍व’ पाहण्याची मुलांना संधी, ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला अखेर यश

महापालिकेच्या ‘एव्हिएशन गॅलरी’चे अखेर उड्डाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षे बंद असलेली महापालिकेची ‘एव्हिएशन गॅलरी’ अखेर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतच ‘एव्हिएशन गॅलरी’ सुरू झाल्यामुळे लहान मुलांना विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, रॉकेटच्या प्रतिकृतींसह त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ‘एव्हिएशन गॅलरी’ सुरू होण्यासाठी ‘सकाळ’कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

महापालिकेने शिवाजीनगर गावठाण परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून ‘सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी’ उभारली होती. मार्च २०२०मध्ये या एव्हिएशन गॅलरीचे उद्‌घाटन झाले. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने काही दिवसांतच गॅलरी बंद करावी लागली. त्यानंतर महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले.

तेव्हापासून संबंधित गॅलरी धूळ खात पडून असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने ११ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रसिद्ध केले. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एव्हिएशन गॅलरी पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

महापालिकेने एव्हिएशन गॅलरी चालविणे व त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाबाबत दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविल्या. दुसऱ्या प्रक्रियेमध्ये महालक्ष्मी एव्हिएशन कंपनीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. महालक्ष्मी एव्हिएशन प्रा. लि. या कंपनीला प्रतिमहा एक लाख एक हजार ३७० रुपये इतक्‍या दराने ही गॅलरी भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यानंतरही अडचणींवर मात करत २१ एप्रिलपासून ‘एव्हिएशन गॅलरी’ सुरू झाली. सुट्ट्या असल्याने पहिल्या दिवसापासूनच गॅलरी पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

गॅलरीमधील आकर्षणाच्या गोष्टी

  • एव्हिएशन गॅलरीमधील प्रदर्शन

  • विमान, हेलिकॉप्टरर्सचे मॉडेल्स

  • ड्रोन, एअरोमॉडलिंग, पॅरामोटरिंग, दृकश्राव्य सादरीकरण

  • लहान मुलांना मिळतेय विमान, अंतराळ विज्ञानविषयीची शास्त्रशुद्ध माहिती

  • शहरातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची व्यवस्था

कसे जाल?

  • शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनच्या पाठीमागील बाजूला एव्हिएशन गॅलरी आहे. त्याबाबतचे दिशादर्शक फलकही तेथे लावण्यात आले आहेत.

  • वेळ : सकाळी आठ ते रात्री नऊ

  • तिकिट दर : लहान मुले १० रुपये, प्रौढांसाठी २५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT