ym.jpg 
पुणे

अन् चक्क यमराज रस्त्यावर उतरला...

सकाळवृत्तसेवा

पुणे : "सुरक्षित अंतर ठेवा, नाहीतर माझ्यासोबत चला", "कोरोना माझा मित्र आहे, त्याच्यापासून दूर रहा" या कुठल्याही मोर्चातील घोषणा नाहीत, तर आपल्या वाहनासह (रेडा) रस्त्यावर उतरलेल्या यमराजाने पुणेकरांना दिलेला हा सल्ला आहे ! निमित्त होते, नागरीकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृतीसाठी स्वारगेट पोलिसांनी काढलेल्या अनोख्या फेरीचे.

शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे प्रशासन लॉकडाऊन करुन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. असे असतानाही काही नागरीक लॉकडाऊनच्या नियमांनाच थेट हरताळ फासत असल्याची सद्यस्थिती आहे. या पार्श्वभुमीवर स्वारगेट पोलिसांनी अनोखी शक्कल लढविली.

स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद, सेवाभावी संस्था पदाधिकारी रविन्द्र हुले, भरत सुराणा, अल्ताफ सौदागर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरीकांमध्ये कोरोनाविषयक जागृती करण्यासाठी कलाकाराच्या मदतीने प्रतीकात्मक स्वरुपात यमराजाद्वारे महर्षीनगर, मुकुंदनगर, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसर, जेधे चौक या परीसरात पायी फेरी मारली. त्यावेळी यमराजाच्या वेशभुषेतील कलाकाराने विविध प्रकारच्या घोषणा देत नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे, मास्क, सैनीटायझर वापरण्याचे आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT