bappa.jpg 
पुणे

Video : गणेशोत्सवानिमित्त जागृती करण्यासाठी पुणे पोलिसांसह मराठी सेलिब्रेटीही मैदानात 

सकाळवृत्तसेवा

पुणे : "कोरोनामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुयात', "घरीच विसर्जन करा", "गर्दीत जाण्याचे टाळा,' असा संदेश देत आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे व तारका. उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, पुणेकरांमध्ये जागृती घडविण्यासाठी मराठी कलाकारांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेत उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे पोलिसांकडून मार्च महिन्यापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सवात पोलिस सतर्क असतात, यंदा मात्र, त्यांच्यावर कोरोनाचा संसर्ग रोखण्याचीही आणखी एक जबाबदारी आली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुढाकार घेत पुणेकरांमध्ये जनजागृती करण्यास प्राधान्य दिले आहे.

पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टितील अनेक कलाकारांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतानाच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, सुबोध भावे, उपेन्द्र लिमये, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, ओम भुतकर, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आदी कलाकारांनी जनजागृतीपर व्हिडिओमध्ये सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 
या व्हिडिओमध्ये यंदाच्या बाप्पाचा देखावा घरीच करुयात, श्री गणेशाची घरीच मूर्ती बनवुन तिचे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन सुबोध भावे यांनी केले आहे. तर घरी मूर्ती बनविणे शक्‍य नसेल तर बाहेरुन आणा, मात्र तिचे विसर्जन घरीच करा, असे अभिनेत्री श्रुती मराठे यांनी व्हिडीओद्वारे सांगितले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पोलिस व पुणे महापालिका यांनी केलेल्या आवाहनानुसार  मूर्तीचे घरीच विसर्जन करा
- उपेंद्र लिमये, अभिनेता. 

 

समाजावर विचारवंत व कलाकारांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाच अनेक मोठ्या कलाकारांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्फत नागरिकांना संदेश दिला आहे. हे व्हिडिओ पाहून पुणेकर नक्कीच त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने व घरच्या घरी साजरा करतील. 
- डॉ. रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...

Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तुळशीच्या लग्नानंतरच लग्नांचा शुभ मुहूर्त का सुरू होतो? जाणून घ्या कारण!

IND vs AUS, Viral Video: मैदानात शुभमन गिल बॅटिंग करत होता अन् कॅमेरा वळाला सारा तेंडुलकरकडे, पाहा कशी होती रिअॅक्शन

World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

SCROLL FOR NEXT