Students_Admission 
पुणे

विद्यार्थ्यांनो, बी.ए., बी.कॉम.च्या ऑनलाईन अॅडमिशनला आजपासून होणार सुरवात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष बी.ए. आणि बी.कॉम. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. दूरस्थ शिक्षणपद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी (ता.२४ जुलै) दुपारी तीन वाजल्यापासून मुक्त अध्ययन प्रशाळेच्या http://unipune.ac.in/sol/ या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातील निवडक महाविद्यालयातील मुक्त अध्ययन प्रशाळेच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाचे असून प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यास केंद्रावर जाऊन सध्याच्या परिस्थितीत सादर करू नयेत. प्रवेश अर्ज सादर करण्यासंदर्भातील सूचना नंतर जाहीर करण्यात येतील, याची विशेष नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती मुक्त अध्ययन प्रशाळेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदव्युत्तर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT