Pune University Sakal media
पुणे

बीए लिबरल आर्टस् आणि बीएस्सी ब्लेंडेड प्रवेश प्रक्रिया सुरु

मिनाक्षी गुरव

पुणे : विविध विषय आणि विद्याशाखांमधील आंतरसंबंध समजून घेत प्रश्नांची समग्र उत्तरे शोधण्यावर भर देणारे बी.ए. लिबरल आर्ट्स (BA Liberal Arts) आणि बीएस्सी ब्लेंडेड (BSC Blended) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी स्कुल ऑफ सायन्स (IDSS) विभागामध्ये हे अभ्यासक्रम गेल्या दोन वर्षांपासून चालविण्यात येत आहेत. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे अभ्यासक्रम सार्वजनिक विद्यापीठाच्या पातळीवर राबवविले जात आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा जुलै २०२१ मध्ये होणार आहे.त्यासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (university website) सुरू झाली आहे.(BA Liberal Arts BSC Blended Admission process starts savitribai phule pune university)

बीए लिबरल आर्टस् हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला पात्र ठरतो. विज्ञान, कला, मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन अशा विविध विद्याशाखांमधील अनेक विषयांची एकमेकांशी सांगड घालणारा, तसेच आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणारा लिबरल आर्टस् हा अभ्यासक्रम अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. विद्यापीठातील या अभ्यासक्रमात विविध क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या प्रमुख विषयांसोबतच एका विषयाचा पदवी पातळीवर सखोल अभ्यास करण्याची सोय उपलब्ध आहे. त्याखेरीज कौशल्य अनुभव आणि प्रत्यक्ष प्रकल्पांवर आधारीत विषय निवडण्याचीही संधी त्यात आहे.

विज्ञानातील विविध विषयांचा समन्वय साधणे हे सूत्र मध्यवर्ती ठेवून ‘बीएससी ब्लेंडेड’ अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला पात्र ठरतील. या अभ्यासक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूशास्त्र (अर्थ सायन्सेस) या चारपैकी एका विषयाचा पदवी पातळीवर सखोल अभ्यास (स्पेशलायझेशन) करता येईल. विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाचे सहकार्य मिळाले आहे. याही अभ्यासक्रमासंबंधीचे वेबिनार लवकरच घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी वेबिनार

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण, कौशल्यविकास या मुल्यांवर भर दिला आहे. बीए लिबरल आर्ट्स अभ्यासक्रमाची रचना त्याच्याशी सुसंगत आहे. हा अभिनव अभ्यासक्रम आणि त्यातील प्रवेशाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या बुधवारी (ता.३०) दुपारी चार वाजता झुम वेबिनार आयोजित केला आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘bla.idss.sppu@gmail.com’ ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT