Doberman_Leopard
Doberman_Leopard 
पुणे

बिबट्याच्या तावडीतून डॉबरमॅनला वाचवलं; जीव धोक्यात घालणाऱ्या बढे कुटुंबीयांची होतेय चर्चा!

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : इमानदार प्राणी म्हणून कुत्रा (श्वान) ओळखला जातो. स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटसमयी मालकाचे रक्षण पाळीव श्वानाने केल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत, पण आपल्या पाळीव श्वानासाठी मालकाने स्वतःचा जीव धोक्यात घातल्याची घटना दुर्मीळ आहेत.

कांदळी (ता.जुन्नर) येथील अशोक बढे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी (ता.२६) पहाटे स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्याच्या जबड्यातून आपल्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानाची सुटका केली आहे.

शनिवारी पहाटे पाच वाजता कांदळी येथील अशोक बढे यांच्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला चढविला. श्वानानेसुद्धा बिबट्यावर प्रतिहल्ला चढविला. यावेळी झालेल्या आवाजामुळे अशोक बढे, सुभाष बढे, प्रवीण बढे यांना जाग आली. बढे कुटुंबीयांनी आरडाओरडा केला, पण बिबट्याने श्वानाची मान पकडली होती. त्यामुळे त्याची सुटका करण्यासाठी अशोक बढे आणि इतरांनी प्रयत्न केला.

हातात काठ्या घेऊन बिबट्याचा सुमारे दोनशे मीटर पाठलाग केला. फटाके वाजवल्यामुळे श्वानाची मान सोडून बिबट्या ऊसाच्या शेतात पसार झाला. मात्र, मानेत दात घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे, अशी माहिती बढे यांनी दिली. 

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊ देवाडे यांनी दखल घेत स्वतः वन विभागाच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना घेऊन दुपारी कांदळी गाठले. श्वानावर उपचार सुरू असून मानेतून सुरू असलेला रक्तस्राव थांबला आहे. मागील वर्षी बिबट्याच्या हल्ल्यात आमचा जर्मन शेफर्ड जातीचा श्वान ठार झाला आहे. डॉबरमॅनने या पूर्वी बिबट्याचा हल्ला परतवून लावला होता. श्वानाला वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती संकेत बढे यांनी दिली.

जुन्नर तालुक्याच्या मध्य बागायती भागात बिबट्याची संख्या वाढली आहे. ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या रोज घटना घडत आहेत. मात्र पिंजरा लावण्याच्या पलीकडे वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत. बिबट्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना न केल्यास पुढील काळात बिबटे आणि शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT