Swarnav Rescued from punawale crime branch police  
पुणे

पुणे : अपहरण झालेला स्वर्णव अखेर आठ दिवसांनी सापडला

सकाळ डिजिटल टीम

बावधनमधून अपहरण झालेल्या चार वर्षांचा स्वर्णव पुनावळेत सुखरुप सापडला आहे.

पुणे - पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षांचा मुलगा स्वर्णव अखेर आठ दिवसांनी सापडला आहे. ११ जानेवारीला त्याचं बालेवाडीतून अपहरण झालं होतं. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते ३५० च्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलाचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.(Swarnav Kidnapping Case: Rescued from punawale)

स्वर्णवच्या अपहरणानंतर याबाबत चतुश्रृंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता स्वर्णव सापडल्यानंतर पालकांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे. दरम्यान, त्याचे कशासाठी अपहरण केलं, कारण काय याचा पोलिस शोध घेत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं का केलं हे मात्र अजून कळू शकते नाही,त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून मंगळवारी (ता.11) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय 4 वर्षे ) यास एक मुलगा "डे केअर'ला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता. त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते. हा प्रकार बालेवाडी पोलिस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला. याप्रकरणी मुलाच्या आई-वडीलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT