manchar bank
manchar bank 
पुणे

कंटेनमेंट झोनमधील बँका- पतसंस्थांबाबत घेतलाय हा महत्त्वाचा निर्णय

डी. के. वळसे पाटील

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले असले, तरी बँका व पतसंस्था बुधवारपासून (ता. 8) सुरू झाल्या आहेत, अशी माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मंचर कंटेनमेंट क्षेत्र जाहीर केले आहे. त्यामुळे कालपासून काही जणांनी बँका व पतसंस्था बंद केल्या. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यासंदर्भात आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी बँका पतसंस्था सुरू ठेवण्याबाबत मान्यता दिली आहे.   

बँका पतसंस्था बंद झाल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्व बँका व पतसंस्था सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर, थर्मल गनद्वारे तापमान मोजण्याचे काम करणार आहेत. सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची ग्वाही बँका व पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या मागणीचा विचार करून प्रांत अधिकाऱ्यांनी बुधवारपासून बँका व पतसंस्था सुरू करण्याचे सूचित केले आहे. सर्व ग्राहकांनी सोशल डिस्टन्स नियम पाळून बँका व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही शहा यांनी केले आहे. या निर्णयामुळे बँकेच्या ग्राहकांना विशेषतः शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.     

दरम्यान, पुणे, औंध, पिंपरी चिंचवड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करून घेण्यास तेथे बेड शिल्लक नसल्याने असमर्थता दाखवली जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यातून तातडीने मार्ग काढण्यासाठी मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या कोविड उपचार केंद्रात दोन फिजिशियन उपलब्ध करून दिल्यास येथील कामकाजाला गती येईल. यासंदर्भात देवेंद्र शहा यांनी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली. वळसे पाटील यांनी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बरोबर चर्चा केली असून, मंचर शहरातील खासगी फिजिशियन यांनाही आवाहन केले आहे. खाजगी डॉक्टरांनीही या मदत कार्यात सहभागी होण्या विषयी सहमती दर्शविली आहे, असे शहा यांनी सांगितले. 

कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांचे काम समाधानकारक, शरद पवार यांनी थोपटली पाठ
 
दरम्यान, आज प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी यांनी आळेफाटा ,मंचर, नारायणगाव परिसरातील सर्व बँका व पतसंस्था सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शासनाचे सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT