पुणे

बारामतीकरांनो, काळजी घ्या! पुन्हा निर्बंधाची वेळ आणू नका : अजित पवार

मिलिंद संगई, बारामती

बारामती : शहर व परिसरातील कोरोना बाधितांची टक्केवारी पाच टक्क्यांहून अधिक झाल्यास पुन्हा निर्बंध लावावे लागतील, त्या मुळे बारामतीकरांनी नियमांचे पालन करुन कोरोनाबाधितांचा आकडा वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर व्हीआयआयटी सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, ''टास्क फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरु आहे. ऑक्सिजनची गरज वाढण्याची शक्यता गृहित धरुन ऑक्सिजनचा साठा करुन ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच मॉल मध्ये प्रवेश देणे बंधनकारक करावे, लसीकरणांचे नियोजन व्हावे, पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य दयायला हवे.''

बारामतीमध्ये एम.आ.डी.सी. मधील कंपन्या व व्यापा-यांसह नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामतीत तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित कराव्यात. काही नागरिक मास्क वापरतांना दिसत नाहीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसते या बाबी टाळून नियम पाळायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच...

या बैठकीपूर्वी सांगली जिल्ह्यातील खिद्रापूर येथील पूरग्रस्तांना अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ आणि पांडुरंग प्रतिष्ठान गोकुळवाडी व अनिता गायकवाड यांच्या सहकार्याने दीड लाखांच्या जीवनावश्यक वस्तुंची किट पाठविण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुरग्रस्त भागाकडे ही मदत रवाना करण्यात आली.

पुण्यातील तुकाराम भापकर प्रतिष्ठान व सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने एनव्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांना पाणी पुरविण्यासाठी 5 पाण्याचे टँकर प्रदान केले गेले.

बारामतीतील यादगार सोशल फांऊडेशन यांच्यावतीने 5 आर.ओ. प्युरीफायर व 1000 लिटर वॉटर टँकच्या पाच टाक्या दर्गा मशिद, सिध्देश्वर मंदिर, महिला ग्रामीण रुग्णालय, बारामती शहर पोलिस स्टेशन यांना व पुणे जिल्हा ॲम्ब्युलन्स असेसिएशन यांच्यावतीने 1 लाख रुपयांचा धनादेश कोविडसाठी मदत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस की भाजप? अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकीय फायदा कुणाला?

Pimpri Chinchwad Crime : काळेवाडीतील लकी बेकरी चौकात पैशांच्या कारणावरून तरुणाचा खून

T20 WC: भारत जिंकतोय खरा, पण...! अनिल कुंबळे, फॅफ ड्यू प्लेसिस यांनी व्यक्त केली चिंता; वेस्ट इंडिजविरुद्ध ही उणीव पडणार महागात

Aurangzeb Daughters : औरंगजेबाने कधीच स्वतःच्या मुलींचे लग्न का केले नाही? कारण वाचून अंगावर येईल काटा, हा क्रूर इतिहास ठेवलेला दडवून

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

SCROLL FOR NEXT