Baramati esakal
पुणे

Baramati: बारामती सहकारी बँकेत मोठ्या घडामोडी; अजित पवारांच्या सूचनेवरुन चौघांचे राजीनामे

रुपेश नामदास

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या ताब्यात असलेल्या बारामती सहकारी बँकेत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी राजीनामे दिले आहेत.

मात्र यांनी अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या राजीनामे दिल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बारामती सहकारी बँकेने भरीव कामगिरी करत बँकेचा एनपीए लक्षणीयरित्या खाली आणला व बँकेला यंदा चांगला नफा झाला आहे.

बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी गेले वर्षभर सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अथक परिश्रम केले होते. बँकेने यंदा सात कोटी नव्वद लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी संचालक मंडळाच्या पुनर्रचनेसाठी हे राजीनामे घेतले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बँकेचे उपाध्यक्षपदी यंदा महिला संचालिकेस स्थान मिळणार का, याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील पूर्णत्वास आलेला पूल धोक्याचा

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT