crime  esakal
पुणे

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी खूनाच्या गुन्ह्याची केली उकल

सतत दारु पिऊन आई वडीलांना त्रास देणा-या मुलाचा आई वडीलांनीच सुपारी देऊन खून घडविल्याची घटना उघड झाली.

मिलिंद संगई

बारामती - सतत दारु पिऊन आई वडीलांना त्रास देणा-या मुलाचा आई वडीलांनीच सुपारी देऊन खून घडविल्याची घटना उघड झाली आहे. बारामती तालुका पोलिसांनी कौशल्याने तपास करुन हा खून उघडकीस आणला.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, फौजदार राजेश माळी, कल्याण शिंगाडे, राम कानगुडे, सुरेश दडस, गोदेश्वर पवार, सदाशिव बंडगर, संतोष मखरे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, महेश कळसाईत यांच्या पथकाने हा गुन्हा उघड केला.

शिर्सुफळच्या तलावा 26 मे 2023 रोजी एका युवकाचा मृतदेह दगड व लोखंडी तारेने बांधून टाकून दिलेला होता. या घटनेनंतर तालुका पोलिसांनी खब-यांमार्फत सखोल तपास केला. दौंड तालुक्यातील रावणगाव येथे पोपट भानुदास बाराते, त्याची पत्नी मुक्ताबाई व मुलगा सौरभ गावातून गायब झाले होते. कालांतराने पती पत्नी पुन्हा गावात परतले, मुलगा गायबच होता.

पोलिसांनी पती पत्नीकडे सखोल तपास केल्यानंतर मुक्ताबाईने मुलगा दारू पिऊन मारहाण करत असल्याच्या कारणावरुन बबलू तानाजी पवार यास सौरभ बाराते यास ठार मारण्यासाठी पावणे दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती.

बबलू पवार याने बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे व अक्षय चंद्रकांत पाडळे यांच्या मदतीने सौरभ यास ठार मारून त्याचा मृतदेह शिर्सुफळच्या तलावात टाकून दिला होता. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT