आयर्नमॅनला घालणार गवसणी sakal
पुणे

बारामतीत वडीलांपाठोपाठ मुलगाही आयर्नमॅनला घालणार गवसणी

बारामतीचा युवा खेळाडू आता जागतिक स्तरावरी आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बारामतीचा युवा खेळाडू आता जागतिक स्तरावरी आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी सज्ज झाला आहे. बारामतीचा अभिषेक सतीश ननवरे हा येत्या 21 नोव्हेंबर रोजी साऊथ आफ्रिकेतील गबेरा येथे होणा-या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणार आहे. शारिरीक क्षमता, जिद्द व चिकाटी यांचा कस पाहणारी ही स्पर्धा असते. जागतिक स्तरावरील स्पर्धक यात सहभागी होतात.

अभिषेक हा बारामतीचे पहिले आयर्नमॅन सतीश ननवरे यांचा मुलगा. वडीलांच्या दैनंदिन संपर्कात असताना त्यालाही आयर्नमॅन बनण्याची महत्वाकांक्षा खुणावत होती, त्यानेही याचा सराव सुरु केला व आता तो प्रत्यक्षपणे या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

या स्पर्धेत अभिषेक हा 3.8 कि.मी. पोहोणे, 180 कि.मी. सायकलींग व 42.2 कि.मी. धावणे अशा तिहेरी प्रकारात (ट्रायथॉलॉन) सहभागी होणार आहे. या तिन्ही प्रकारातील अंतर 16 तासांच्या आत पूर्ण करणे अपेक्षित असते. गेल्या दीड वर्षांपासून अभिषे दररोज किमान आठ तास सराव करीत आहेत. सतीश ननवरे यांनीही दोनदा आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. बारामतीत उत्तम खेळाडू घडावेत या उद्देशाने त्यांनी बारामती स्पोर्टस फाऊंडेशनची स्थापना केली. वडीलांपासून प्रेरणा घेत आता अभिषेकही आयर्नमॅनसाठी स्पर्धेत उतरणार आहे.

त्याने गेल्या अनेक दिवसांपासून या साठी सराव सुरु ठेवला आहे. खडतर स्पर्धेला व बदलत्या वातावरणाला मिळत जुळत घेत या स्पर्धेला सामोरे जावे लागते, त्या दृष्टीने त्याची तयारी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT