Murder esakal
पुणे

Crime News : प्रेयसीला भेटण्यास आलेल्या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू; पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

बारामतीहून प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बारामतीहून प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संग्राम हनुमंत साळुंके (वय २२, रा. वडकेनगर, बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शशांक जाधव यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन रेणुसे, आदित्य गवळी आणि अनिकेत चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामची आंबेगाव पठार परिसरातील एका महिलेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. संग्राम प्रेयसीला भेटण्यासाठी बिबवेवाडी भागात येणार असल्याची माहिती रेणुसेला मिळाली होती.

संग्राम दोन डिसेंबरला सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी परिसरात एका सर्व्हिसिंग सेंटरजवळ आला होता. आरोपींनी संग्रामला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर परिसरातील गॅस गोदामाजवळ नेले. त्याठिकाणी त्याला बेदम मारहाण केली. त्यात संग्राम गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संग्रामला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, संग्रामवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यातच आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे संग्रामचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Rishabh Pant Replacement : रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी? ना इशान, ना संजू; BCCIने जाहीर केलं दुसरंच नाव

Harshvardhan Sapkal: भाजप, राष्‍ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळीचा नारद!

Soldier Death:जवानाच्या चितेला अग्नी देण्यासाठी ८ तासांच बाळ अन् पत्नी स्ट्रेचवरून आली, सातारा हळहळला; मुलीचा चेहरा पाहण्याआदीच मृत्यूने गाठलं...

SCROLL FOR NEXT