baramti sakal
पुणे

Baramati : बारामतीत विषमुक्त निर्यातक्षम डाळिंब उत्पादन परिसंवादाला उत्तम प्रतिसाद राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन

बारामती तालुका फलोत्पादन संघ आणि माण देशी फौउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरील परिसंवादाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

माळेगाव - कोणतीही फळबाग लागवड करत असताना रोपांच्या उत्तम वाणाची निवड व्हावी. तसेच जमिनीच्या आरोग्यावर लक्ष द्यावे. जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीव सेंद्रिय कर्ब आणि त्याच बरोबर संपूर्ण विषमुक्त उत्पादनावर भर दिला पाहिजे. याशिवाय झाडांना व पिकांना पाणी देताना पाण्याचे व्यवस्थापनही तितकेच महत्वाचे आहे, तरच आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळते. ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट, बारामती अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे,`` असे मत अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

शारदानगर (ता.बारामती ) येथे “ विषमुक्त निर्यातक्षम डाळिंब उत्पादन परिसंवाद ” आयोजित केला होता. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसंचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), आत्मा संस्था- पुणे, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, अटल इन्क्युबेशन सेंटर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र- सोलापूर, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ,

बारामती तालुका फलोत्पादन संघ आणि माण देशी फौउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरील परिसंवादाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी सातारा, सोलापूर, पुणे, नगर, सांगली या जिल्हातील डाळिंब उत्पादक शेतकरी वरील परिसंवादासाठी उपस्थित होते.

आयसीएआर पुण्याचे संचालक डॉ.सुब्रोतो रॉय यांनी शासनाच्या विविध योजना उपस्थितांपुढे मांडल्या. शेतकऱ्यांनी शास्त्रयुक्त तंत्रज्ञानाची माहिती घेतली पाहिजे. तसेच भविष्यामध्ये शेती करताना मनुष्य बळाचा कमी वापर आणि यांत्रिकीकरणासारख्या तंत्रज्ञानाचा अधिकचा उपयोग होण्याची नितांत गरज आहे, असे सांगून डाॅ.

राॅय यांनी बारामती केव्हीकेमधील विषमुक्त निर्यातक्षम डाळिंब उत्पादन परिसंवादाचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (सोलापूर) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सोमनाथ पोखरे यांनी डाळिंब पिकातील प्रभावी सुत्रकृमी (निमॅटोड) व्यवस्थापण या विषयी मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ डॉ.ज्योत्सना शर्मा यांनी डाळिंबावरील तेल्या, मर रोग आणि खोड किडा व्यवस्थापण, तसेच भविष्य येणाऱ्या अडचणींविषयी आपले मत मांडले. महाराष्ट्र शिक्षण आणि संशोधन परिषदेचे (पुणे) संशोधन संचालक डॉ.हरिहर कौसडीकर यांनी बदलत्या हवामानात डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन तंत्रज्ञान उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. होमिओपॅथी तज्ञ विश्वजित वाबळे यांचेही यावेळी मार्गदर्शन केले.

दुसरीकडे, काटेवाडी येथील शेतकरी अजिंक्य भाऊसाहेब काटे यांच्या निर्यातक्षम डाळिंब उत्पादन प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र) डॉ.विवेक भोईटे यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडून आणली. यावेळी राजेंद्र पवार, सुब्रोतो रॉय, भाऊसाहेब काटे, वसंतराव घनवट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुण्याचे संजय काचोळे, शहाजीराव जाचक, प्रमोद निंबाळकर, सुनिल पवार, रामभाऊ कदम, करण चेतना, विजय सिन्हा, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, धीरज शिंदे, ओंकार ढोबळे आदींनी विविध मुद्दे उपस्थित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT