Medical College Baramati sakal
पुणे

Baramati : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविदयालय होणार नामकरण

बारामती - येथील शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

मिलिंद संगई,

बारामती - येथील शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी हा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने हा निर्णय घेतला आहे. बारामतीतील वैदयकीय महाविद्यालयात पाचशे विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय व पाचशे खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय सुरु झाले आहे. या महाविद्यालयाचे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या नुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे नामकरण करण्यात आले असून त्या नुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांनी या बाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहे.

या महाविद्यालयाची ओपीडी सुरु झाली असून दैनंदिन पाचशेहून अधिक रुग्ण याचा लाभ घेत आहेत. या महाविद्यालयातील सोनोग्राफी, एक्सरे, सिटी स्कॅन हे विभाग सुरु झाले असून शस्त्रक्रिया करण्यासाठी लवकरच सीएसएसडी प्रणालीचेही काम पूर्णत्वास जाणार आहे. या महाविद्यालयात सुसज्ज अशी अकरा ऑपरेशन थिएटर्स असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात सुसज् शासकीय रुग्णालय असा याचा नावलौकीक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Well Water Waves विहिरीत समुद्रासारख्या लाटा, पाण्याची गूढ हालचाल; VIRAL VIDEOने खळबळ, गावकऱ्यांनी काय सांगितलं?

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे बरा म्हणायची वेळ आणू नका; फडणवीस, शिंदे, बावनकुळेंसह विखे पाटलांवर मनोज जरांगेंचा घणाघात

Kitchen Vastu Tips: तुमचे स्वयंपाकघर योग्य दिशेला आहे का? जाणून घ्या गॅस शेगडी आणि सिंक कुठे असावे!

Monsoon Skincare Mistakes: पावसाळ्यात स्किनकेअर करताना अनेकजण करतात 'ही' चूक; तुमच्याकडूनही होत नाही ना?

FDA Action: हॉटेल, रेस्टारंटवर करडी नजर, अ‍ॅनालॉग पनीरवरील बंदीनंतर एफडीएची राज्यभरात विशेष तपासणी

SCROLL FOR NEXT