Baramati Lok Sabha 2024
Baramati Lok Sabha 2024 esakal
पुणे

Baramati Lok Sabha 2024: "शरद पवारांचा पराभव करायचा, इतना काफी है..."; चंद्रकांत पाटलांनी दंड थोपटले!

मिलिंद संगई, बारामती

Baramati Lok Sabha 2024:  गेल्या वेळेसच्या निवडणूकीच्या मिळालेल्या मतांचे गणित उलगडत यंदा अजित पवार सोबत असल्यामुळे महायुतीचा बारामती लोकसभेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, आमच्या विजयाचे गणित सोपे आहे, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय बैठकीनंतर ते बोलत होते. पाटील म्हणाले, निवडणुका घोषित झाल्या, 16 घटकपक्ष मिळून महायुती तयार झाली आहे. त्याचा समन्वय थेट बूथ लेव्हलपर्यंत व्हावा त्याची सुरवात करण्याचा समन्वय बैठकीतून प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक विधानसभेतील पन्नास प्रमुखांना बोलाविण्यात आले होते. सगळ्यांची मोट कशी बांधायची, यादी वाचन कसे करायचे, मतदानाला मतदारांना कसे बाहेर काढायचे, एकी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. जवळपास सर्वच नेते या बैठकीस उपस्थित होते.

गेल्या वेळेस राष्ट्रवादी नसतानाही पाच लाखाहून अधिक मते भाजपला मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादी आता सोबत असल्याने कमी पडलेली मते आम्ही सहज मिळवू. अजित पवार सोबत आले याचा अर्थ त्यांनी मिळविलेली किमान निम्मी मते घेऊन ते आमच्या सोबत आहेत, हा हिशोब केल्यास आम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास आजच्या बैठकीत आम्ही एकमेकांना दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Latest Marathi News)

एकीकडे देशस्तरावर मोदींनी केलेली कामे, राज्यस्तरावर सरकारने केलेली कामे यांची एक मोठी पूंजी आमच्याकडे आहे, त्या मुळे मतदार आमच्या पाठीशी निश्चित उभा असेल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील सोबत नसतानाही आम्ही मागच्या वेळेस मते घेतली होती, राज्यातील सर्वांना समजून सांगणारे देवेंद्र फडणवीस नावाचे औषध आमच्याकडे आहे, ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, महादेव जानकर यांच्याबाबत निश्चित तोडगा निघेल. तुम्ही काळजी करु नका पुढच्या आठवड्यापासून हे सगळे एकत्र फिरताना दिसतील.

"राजकारणात तराजू लावायचे असतो, शरद पवारांचा पराभव हा आम्हाला जास्त वजनदार वाटतो, अजित पवार काय म्हणाले व काय झाले या पेक्षाही महाराष्ट्रात 2019 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविले. नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली, आज आम्हाला शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला व माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव करायचा इतना काफी है...बाकी गोष्टी आमच्यासाठी कमी महत्वाच्या आहेत", असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT