Baramati Lok Sabha 2024 Esakal
पुणे

Baramati Lok Sabha 2024: सुप्रिया सुळे यंदा ‘चौकार’ ठोकणार, की भाजपचे ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार?

Baramati Lok Sabha 2024: देशातील सर्वात ‘हाय व्होल्टेज’ लढत बारामतीत होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची लढत त्यांचे चुलत बंधू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार, हे जवळपास निश्चित आहे.

सकाळ वृत्तसेवा

Baramati Lok Sabha 2024: देशातील सर्वात ‘हाय व्होल्टेज’ लढत बारामतीत होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची लढत त्यांचे चुलत बंधू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यात विजय शिवतारे यांनीही मैदानात उतरण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारी लढत आता रंगात आली आहे. ओबीसींचा चेहरा म्हणून दौंडच्या महेश भागवत यांनीही उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला. त्यामुळे सुप्रिया सुळे यंदा ‘चौकार’ ठोकणार, की भाजपचे ‘मिशन बारामती’ यंदा यशस्वी होणार, याकडे देशाचेच लक्ष आहे.

२०१९चे चित्र

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी मते : ६,८६,७१४

कांचन कुल (भाजप) मते : ५,३०,९४०

नवनाथ पडळकर (वंचित) मते : ४४,१३४

मंगेश वनशिव (बसप) मते : ६८८२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,५५,७७४

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : राष्ट्रवादी

२०१९ : राष्ट्रवादी

सद्य:स्थिती

भाजप नेते हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल हे अजित पवार यांच्याशी जुळवून घेणार का?

भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे यांना खंबीर साथ देणार का?

काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा पाठिंबा सुळे यांना कायम राहणार का?

विजय शिवतारे यांची उमेदवारी मागे घेण्यात महायुतीला यश येणार का?

महेश भागवतांचा कोणाला फटका बसेल?

हे प्रभावी मुद्दे

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी

दौंड, इंदापूर, पुरंदर व बारामतीच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न

भोरमधील एमआयडीसीचा रखडलेला प्रश्न

कात्रज बोगदा ते चांदणी चौक मार्गे देहू रोडपर्यंत महामार्गावरील वाहतुकीची कोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT