Baramati Lok Sabha Election campaign 2024 NCP Sharad Pawar VS Ajit Pawar marathi Political News  
पुणे

Lok Sabha Election 2024 : बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार सामना... दोन्ही दिग्गज उतरले प्रचाराच्या मैदानात

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीगाठींसह संपर्काचा धडाका लावला आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीगाठींसह संपर्काचा धडाका लावला आहे. यंदाची निवडणूक ही थेट शरद पवार विरुध्द अजित पवार अशीच होणार असल्याने दोघांनीही तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.

अजित पवार काल आणि आज दोन दिवस बारामतीतच असून त्यांनी विविध घटकांशी चर्चा, सभा, मेळावे, सांत्वनभेटींसह डिनर डिप्लोमसीही साधली. शरद पवार यांनीही विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्यासह संपर्कावर भर दिला आहे.

गेल्या काही दिवसांपर्यंत बारामतीत निवडणुकीचे वातावरणच वाटत नव्हते, आता मात्र दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात येत असून खुद्द शरद पवार व अजित पवारच मैदानात उतरलेले असल्याने बारामतीच्या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी 17 दिवस मिळणार असून या काळात सर्वच विधानसभा मतदारसंघात फिरुन प्रचाराचे आव्हान सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यासमोर असेल. स्टार प्रचारकांच्या यादीतील किती वक्त्यांच्या सभा या मतदारसंघात होणार याकडेही मतदारांचे लक्ष आहे.

दरम्यान येथील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या गुरुवारी (ता. 18) पुण्यात आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने पुण्यात दोन्ही बाजूने मोठे शक्तीप्रदर्शन होईल अशी अपेक्षा आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल हा असल्याने आदल्या दिवशी म्हणजे 18 एप्रिल रोजी दोन्ही उमेदवार आपापले अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान सुनंदा पवार व अजित पवार यांनीही अर्ज विकत घेतले असून सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुनंदा पवार व सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार डमी फॉर्म भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांचा बारामती विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (ता.18) तालुक्यातील श्री क्षेत्र कण्हेरी येथून होणार आहे. पवार कुटुंबियांच्या प्रत्येक निवडणुकीचा बारामतीतील नारळ श्री क्षेत्र कण्हेरी येथूनच करण्याची परंपरा आहे, सुप्रिया सुळे यांनी यंदाही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT