Baramati Lok Sabha Esakal
पुणे

Baramati Lok Sabha: निकाल येण्याआधी मानली हार? सुळेंनी ५० हजारांचं लीड घेताच सुनेत्रा पवारांच्या विजयाचे लावलेले बॅनर काढले

Baramati Lok Sabha: बारामतीमध्ये चुरशीची लढत पाहायाला मिळत आहे. अगदी सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बारामतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अगदी सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. दरम्यान बारामतीतील अजित पवार यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेला विजयाचे बॅनर कढण्यात येत आहेत. अजित पवार यांच्या कार्यालयाबाहेर निकाल येण्यापुर्वी विजयाचे बॅनर लावण्यात आले होते. पण आता ते काढण्यात आले आहेत. कारण, सुप्रिया सुळे यांनी ५० हजारांनी लीड घेतलं आहे. त्यामुळे बॅनर काढण्यात आले आहेत. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढण्यात आले आहेत. कारण बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढले आहेत.

बारामतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. भाजपच्या मदतीने अजित पवार यांनी बारामतीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी बारामतीच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला होता. मात्र, बारामतीकरांनी अजितदादांना साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याचे चित्र पहिल्या फेरीत दिसून येते आहे.

यावर्षीची लोकसभा निवडणूक ही अनेक गोष्टींनी महत्त्वाची ठरवणारी, अशी ऐतिहासिक असणार आहे. बारामती, जी फक्त पवारांच्या नावानं ओळखली जाते, तिथे पवारांच्याच घरातले या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहेत.

या निवडणुकीवेळी वाढत्या उन्हामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. बारामती लोकसभेसाठी एकूण 59. 67 टक्के इतके मतदान झाले आहे. सुप्रिया सुळे यंदा ‘चौकार’ ठोकणार, की भाजपचे ‘मिशन बारामती’ यंदा यशस्वी होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT