The Baramati Municipality will install floating solar panels on lake
The Baramati Municipality will install floating solar panels on lake 
पुणे

चक्क तलावावर तरंगणार सोलर पॅनल; मोठया क्षमतेने होणार वीजनिर्मिती

मिलिंद संगई

बारामती : नगरपालिका आता सौरउर्जा निर्मिती प्रकल्पाकडे वळणार असून वीजबिलाचा बोजा कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास प्रारंभ झाला आहे. नगरपालिकेच्या पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल कमी व्हावे या उद्देशाने बारामती शहरातील साठवण तलावांसह नगरपालिकांच्या विविध इमारतींवर सौर उर्जा पॅनेल्स बसविण्याचा प्रस्ताव आता शासनास सादर केला जाणार आहे. 

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी या बाबत माहिती दिली. 
बारामती नगरपालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या 128, 355 व 222 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेच्या तीन साठवण तलावांवर तरंगते सौर उर्जा निर्मितीचे पॅनेल कार्यान्वित करण्याचा हा प्रकल्प आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या तयार होणाऱ्या वीजेमधून पाणीपुरवठा करणारी 85 अश्वशक्तीची विद्युत मोटार चालवायची या दृष्टीने आता काम सुरु झाले आहे. या मुळे या मोटारीचे वीजबिल नगरपालिकेला अदा करावे लागणार नाही. हा प्रकल्प मेढा कार्यान्वित करुन देणार असून तयार होणारी वीज महावितरण खरेदी करणार असून नगरपालिकेच्या बिलातून वीजेचा आकार वजा करुन वीजबिल दिले जाईल, अशा स्वरुपाचा हा प्रकल्प असेल. 

इमारतींवरही सौरउर्जा निर्मिती पॅनेल्स उभारणार...
बारामती नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, रामचंद मलुकचंद गुजर कॉम्प्लेक्स, शारदा प्रांगणासमोरील उद्योग भवन, मंडई, शरदचंद्र पवार उद्योग भवन अशा सहा इमारतींवर सौर उर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून दररोज सहा मेगेवॅट वीज निर्मितीचा प्रस्ताव नगरपालिकेने अगोदरच पाठवलेला आहे, केंद्र शासन स्तरावर तो काही कारणांनी प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही वीज तयार झाल्यास नगरपालिकेच्या पथदिव्यांचे वीजबिल नगण्य होईल व नगरपालिकेचा फायदा होईल. 

पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!

बारामतीचा समावेश अमृत योजनेसाठी प्रस्ताव.....
बारामतीचा समावेश अमृत योजनेत नसल्याने सर्वप्रथम नगरपालिकेचा समावेश अमृत योजनेत करण्यासाठीचा प्रस्ताव नगरपालिका करुन राज्य शासनास पाठविणार आहे. केंद्र शासनातर्फे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी, स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार करण्यासाठी अटल मिशन  फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन  ट्रान्सफॉरमेशन (अमृत) या महत्वाकांक्षी अभियानाचा प्रारंभ 2015 मध्ये झाला आहे. या योजनेत बारामतीचा समावेश झाल्यास नगरपालिकेला सौरउर्जा प्रकल्पासाठी शासनाचे अनुदानही प्राप्त होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT