पुणे

Baramati News : त्यांच्या पाठीशी मराठा समाज राहणार खंबीरपणे उभा..बारामतीत घोषणा

मिलिंद संगई, बारामती

Baramati News : झेंडा कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्यांचा दांडा हा मराठा समाजाचा आहे, जो आरक्षण देईल, त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार आज बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त केला गेला.

जालना येथे मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा व त्या नंतर झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्या प्रसंगी हा निर्धार व्यक्त झाला.

मराठा समाजाच्या महिलांना मारहाण झाली, ही बाब संतापजनक असून अशा घटना घडल्यास मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा दिला गेला. मराठा क्रांती मोर्चामध्ये दुफळी माजविण्याचा काही जणांचा राजकीय डाव असला तरी मराठा समाज एकसंघच असेल, असा निर्धार या प्रसंगी बोलून दाखविण्यात आला.

मराठा समाजाला राजकीय आरक्षणापेक्षाही शैक्षणिक व सामाजिक आरक्षण जास्त महत्वाचे वाटते, हे आरक्षण मिळण्यासाठी समाज एकसंघ असेल, असेही वक्त्यांनी नमूद केले.

केंद्राने आगामी काळात बोलाविलेल्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी करावा, अशीही मागणी केली गेली. राज्यात व केंद्रात मराठा समाजाचे खासदार आमदार असूनही गेल्या चाळीस वर्षात आरक्षण मिळत नाही या बाबत खेद व्यक्त केला गेला.

आरक्षणावर एकत्र का येत नाही...

सरकार पाडणे व बनविणे या साठी थेट गुवाहाटी पर्यंत आमदारांना जाता येते, मग आरक्षणाच्या मुद्यावर सर्वांना एकत्र का येता येत नाही, असा संतप्त सवाल वक्त्यांनी उपस्थित केला.

शांततेतील मोर्चा आता नाही....

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात 58 मूक मोर्चे अत्यंत शांततेने मराठा बांधवांनी काढले, पण त्याचा काहीही उपयोग न झाल्याने आता सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मराठा समाजाचे मोर्चे निघतील, त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही दिला गेला. या पुढील काळातील मोर्चे हे मंत्रालयावर काढण्याची तयारी करण्याचेही सूतोवाच केले गेले. या पुढील मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर तो ठोक मोर्चा असेल असेही जाहीर केले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Winter Fashion: हिवाळ्यात 'कम्फर्ट' आणि 'स्टायलिश' राहायचंय? मग स्मिता शेवाळेच्या खास टिप्स फॉलो करा!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

SCROLL FOR NEXT