पोलिस sakal
पुणे

बारामतीच्या पोलिस निरिक्षकांची तडकाफडकी बदली

जेजुरी पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनिल महाडीक यांची बारामतीचे पोलिस निरिक्षक म्हणून बदली झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बारामती : येथील बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली असून जेजुरी पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनिल महाडीक यांची बारामतीचे पोलिस निरिक्षक म्हणून बदली झाली आहे.

प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे कारण नमूद करण्यात आले असले तरी या तडकाफडकी बदलीमागे काही वेगळी कारणे असल्याची चर्चा बारामतीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची बारामतीत जोरदार चर्चा आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारीही प्रशासकीय बदली असल्याचे सांगत असले तरी इतकी तडकाफडकी बदली होण्यामागे नक्कीच दुसरे कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बारामती हे संवेदनशील शहर समजले जाते. स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीच्या बाबतीत बारकाईने लक्ष असते. बारामतीत चुकीचे कसलेच प्रकार ते खपवून घेत नाहीत. अधिकारी किंवा कार्यकर्ते कोणीही असले तरी चुकल्यावर कारवाई करताना अजित पवार मागेपुढे पाहत नाहीत. गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेचीच चर्चा बारामतीत रंगली होती. सुरवातीला दबक्या आवाजात ही चर्चा होती, मात्र नंतर उघडपणे या बाबी बोलल्या गेल्या. वरिष्ठ अधिका-यांपर्यंतही हे प्रकरण पोहोचले होते, प्रारंभी वरिष्ठांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असेच चित्र होते, मात्र नंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने वरिष्ठांनी तडकाफडकी बदलीचा निर्णय घेतला.

नामदेव शिंदे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली असून त्यांच्या जागी जेजुरीचे पोलिस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी तातडीने कार्यभार स्विकारण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. बारामतीत अधिका-यांनी काही चुकीच्या बाबी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या चुकीला माफी मिळत नाही हेच या घटनेने अधोरेखीत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT