पोलिस  sakal
पुणे

Baramati : एक युक्ती आणि चौदा मोबाईल सहजतेने परत मिळाले....

चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तो मोबाईल कोण कोणत्या राज्यात वापरत आहे

मिलिंद संगई, बारामती

बारामती : अनेकदा छोटीशी युक्ती कशी उपयुक्त ठरते याचा प्रत्यय सध्या पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दल घेत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी एक छोटीशी युक्ती केली आणि त्या युक्तीने अनेकांना त्यांचे हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल सहजतेने परत मिळाले. जे मोबाईल परत मिळतील अशी अपेक्षाच नव्हती असे मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनाही सुखद धक्का बसला...

चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर तो मोबाईल कोण कोणत्या राज्यात वापरत आहे याचे तपशिल पोलिसांना मिळालेले होते. पोलिस अधीक्षकांनी चोरीचा मोबाईल वापरत असलेल्यांना तुम्ही वापरत असलेला मोबाईल चोरीचा आहे, तुमच्याविरुध्द कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्याकडील मोबाईल संबंधित पोलिस ठाण्याच्या पत्त्यावर स्वखर्चाने कुरियरने पाठवून दिले.

बारामती शहर पोलिसांनी नुकतेच असे विविध राज्यातून आलेले चौदा मोबाईल संबंधित मालकांना परत दिले. हे मोबाईल मिळाल्यानंतर मोबाईल धारकांनाही सुखद दिलासा मिळाला. दीड लाखांचे हे मोबाईल असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस कर्मचारी दशरथ इंगवले, सागर जामदार, शाहू राणे, शंकर काळे, महिला पोलीस कर्मचारी माने, गोरड यांनी ही कामगिरी केली. पोलिस कर्मचा-यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधितांना परत दिले गेले.

पोलिस व नागरिक संबंध सुदृढ व्हावेत....

नागरिकांना पोलिस मित्र वाटावेत, अधिकाधिक जनताभिमुख पोलिसिंग असावे, अशी पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची आग्रही भूमिका आहे. त्या मुळे प्रत्येक बैठकीत मोबाईल या जिव्हाळ्याच्या विषयावर ते आढावा घेतात, त्या मुळे फारसे प्रयास न करता अनेकांचे मोबाईल त्यांना सहजतेने मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT