pune  sakal
पुणे

Baramati Sports :बारामतीच्या टीसी कॉलेजचा प्रणव पोमणे जागतिक कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात समाविष्ट...

फलटण तालुक्यातील गोखळीनजिक खटकेवस्ती हे प्रणव याचे मूळ गाव.

मिलिंद संगई, बारामती

बारामती - पार्श्वभूमी अगदी ग्रामीण असली तरी अंगात परिश्रम करण्याची जिद्द असेल तर ग्रामीण युवकही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊ शकतात, ही बाब बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविदयालयाचा प्रणव पोमणे याने सिध्द केली आहे.

फलटण तालुक्यातील गोखळीनजिक खटकेवस्ती हे प्रणव याचे मूळ गाव. बारामतीच्या टीसी महाविद्यालयात अकरावीपासूनच तो शिक्षण घेत आहे. सध्या तो एम.कॉम. मध्ये शिक्षण घेत आहे.

त्याला कॉर्फबॉलमध्ये आवड होती. या खेळात त्याने कौशल्य सिध्द केले होते. त्याचा खेळ इतका अत्युत्तम होता की त्याची जागतिक कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात नुकतीच निवड झाली. 20 ते 29 ऑक्टोबर 2023 दरम्यान तैवानमधील तैपेई येथे ही स्पर्धा होणार आहे.

दरम्यान या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फगवार येथे 13 ते 24 सप्टेंबर दरम्यान होत असून प्रणव पोमणे या शिबीरास उपस्थित राहणार आहे. प्रवण याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुस-यांदा स्थान प्राप्त केले आहे.

दरम्यान या स्पर्धेसाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने प्रणव यास 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देऊ केले आहे. संस्थेचे सदस्य विकास शहा (लेंगरेकर) यांच्या हस्ते त्यास हा धनादेश दिला गेला.

प्रणव यास जिमखाना विभागाचे प्रमुख व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गौतम जाधव व अशोक देवकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रणव याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) व सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), सदस्य विकास शहा (लेंगरेकर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य, रजिस्ट्रार यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT