Baramati News sakal
पुणे

Baramati News : बारामतीत सोळाच दिवसात बदलले उद्यानाचे रुप

इच्छाशक्ती असेल व काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द असेल तर बदल कसा घ़डू शकतो याचा प्रत्यय बारामतीत आला. बारामती नगरपालिकेच्या उद्यानविभागाचे प्रमुख मिलिंद भिसे यांनी अवघ्या सोळाच दिवसात मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील पूनावाला गार्डनचा चेहरामोहरा बदलला.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : इच्छाशक्ती असेल व काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द असेल तर बदल कसा घ़डू शकतो याचा प्रत्यय बारामतीत आला. बारामती नगरपालिकेच्या उद्यानविभागाचे प्रमुख मिलिंद भिसे यांनी अवघ्या सोळाच दिवसात मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील पूनावाला गार्डनचा चेहरामोहरा बदलला.

या उद्यानाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली होती. या उद्यानात सुधारणा करण्याची बारामतीकरांची मागणी होती. त्याकडे दुर्लक्षच केले गेले. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी मिलिंद भिसे यांच्याकडे या उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीने या उद्यानाचे स्वरुपच बदलून टाकले आहे.

या उद्यानातून तब्बल 17 ट्रॉली भरुन कचरा काढला गेला. या उद्यानात टाकलेली आठ टीपर माती वापरुन बारामती शहरातील वसंतनगर, कँनॉल कॉर्नर, लेंडीपट्टी, डीवायएसपी कार्यालय नजिक, टीसी कॉलेज मागे अशा नऊ ठिकाणांचे सुशोभिकरण केले गेले. या बागेत सकाळपासूनच प्रेमीयुगुले येऊन बसत होती, त्या मुळे कुंपण नीट करुन घेतले गेले. दरम्यान बागेतील सर्वच झाडांना रंग दिल्याने ही झाडे अत्यंत सुंदर दिसत आहेत. स्वच्छता झाल्याने उद्यानाचे स्वरुपच बदलून गेले आहे. शहरात काढून टाकलेले दोन हजार पेव्हर ब्लॉक या उद्यानात होते, त्यांचाही वापर करुन सुशोभिकरण केले गेले.

या बागेत संध्याकाळी इन्स्ट्रुमेंटल संगीत सुरु करण्यात येणार असून लवकरच कारंजेही सुरु होईल. फारसा खर्च न करता या बागेचे स्वरुप मिलिंद भिसे यांनी बदलले. या नंतर बागेतील पक्ष्यांची संख्या व खारुताईंची संख्याही वाढली आहे. लवकरच उद्यानात येणा-या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. खेळण्यांचीही दुरुस्ती लवकरच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT