crime
crime Sakal Media
पुणे

बारामती ते सासवड फिल्मी स्टाईलने पोलिसांकडून ट्रकचा पाठलाग

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : तालुक्यातील तांदुळवाडी येथून चोरुन नेलेल्या ट्रकचा थरारक पाठलाग करत सासवडनजिक हा ट्रक ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. एखादया चित्रपटात शोभावा असाच हा सगळा थरार होता. तांदुळवाडी येथील अमोल गुरव यांनी रात्री दहाच्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच 42-3600 हा चोरीला गेल्याची खबर तालुका पोलिसांना दिली. जीपीएसमुळे हा ट्रक मेडद येथे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी तातडीने पोलिस कर्मचारी विजय वाघमोडे, नंदू जाधव व शशिकांत दळवी यांना या ट्रकचा पाठलाग करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस पाठलाग करत आहेत म्हटल्यावर ट्रकचालकाने वेगाने ट्रक चालविण्यास प्रारंभ केला. पोलिस जीप चालक अनिकेत शेळके यांनी आपले कौशल्य दाखवून ट्रकचा पाठलाग केला. मोरगाव येथे एक पिकअप रस्त्यावर आडवा लावून नाकाबंदी गोरख पवार या पोलिसाने केली होती. मात्र ट्रकचालकाने फिल्मी स्टाईलने हा पिकअप उडवून जेजुरीच्या दिशेने प्रयाण केले. पिकअप उडवून पोलिसांच्या अंगावर ट्रक घालून जेजुरीच्या दिशेने निघाल्यानंतर महेश ढवाण यांनी जेजुरीचे अधिकारी महाडीक यांना फोनवरुन जेजुरीमध्ये नाकाबंदी लावायला सांगितली. जेजुरीच्या चौकात एक कंटेनर या ट्रकला थांबविण्यासाठी आडवा लावला गेला. मात्र कंटेनरच्या शेजारी असलेल्या मोकळया जागेत हा ट्रक घुसवून एका दुकानात घुसून ट्रकचालकाने हा ट्रक सासवडच्या दिशेने नेला. घटनेचे गांभीर्य ओळखून महेश ढवाण यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना माहिती दिली. ट्रकचालकाने ट्रक थांबवलाच नाही तर शेवटचा पर्याय म्हणून ट्रकच्या टायरवर गोळी मारुन ट्रक थांबविण्याचा पोलिस विचार करत होते.

मात्र सासवडच्या अलिकडेच ट्रकचा वेग कमी होताच धाडसी पोलिस कर्मचारी विजय वाघमोडे डाव्या बाजूने केबिनमध्ये घुसले, पोलिस केबिनमध्ये आलेला पाहून घाबरुन ट्रकचालकाने ट्रकबाहेर उडी मारली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन थांबला. बाळासाहेब नाझरकर (सध्या रा. तांदुळवाडी, बारामती, मूळ रा. अंबड, जि. जालना) असे या आरोपीचे नाव आहे. याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्यासह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉक़डाऊनमुळे रस्त्यावर गर्दी नव्हती त्या मुळे कोणतीही जीवीत किंवा इतर हानी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT