Motivational Story in Marathi 
पुणे

Motivational : दातृत्वातून बारामती ज्येष्ठांसाठी उभ्या राहिल्या 27 लाखांच्या दोन सुसज्ज इमारती

सामाजिक बांधिलकी जोपासून ज्या समाजाने आपल्याला भरभरुन दिले, त्याची उतराई होण्याच्या कृतज्ञतेतून बारामतीत दोन भव्य वास्तू उभ्या राहिल्या.

मिलिंद संगई,

बारामती - सामाजिक बांधिलकी जोपासून ज्या समाजाने आपल्याला भरभरुन दिले, त्याची उतराई होण्याच्या कृतज्ञतेतून बारामतीत दोन भव्य वास्तू उभ्या राहिल्या. दातृत्व असेल तर काय घडू शकते याचा अनुभव या निमित्ताने बारामतीकरांनी घेतला. तब्बल 27 लाखांच्या दोन इमारती या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी उभ्या राहिल्या.

शहरानजिक तांदुळवाडी येथे असलेल्या कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बारामती ज्येष्ठ नागरिक निवास या संस्थे मध्ये किशोर मेहता यांनी तब्बल 16 लाख रुपये खर्चून तर मेहता भोजन कक्ष तर वास्तूविशारद अभय शहा यांनी श्रमण करमणूक केंद्राची इमारत 11 लाख रुपये खर्चून उभारुन दिली.

Motivational Story in Marathi

सध्याची भोजन कक्षाची जागा अपुरी पडत होती तसेच ज्येष्ठांना करमणूकीसाठी कॅरम, बुध्दीबळ व इतर खेळ खेळता यावेत या उद्देशाने या दोन इमारतींची संकल्पना मांडली गेली व ती प्रत्यक्षातही उतरली.

आयुष्याच्या संध्याकाळी समवयस्कांसमवेत आवडीनिवडी जोपासत वेळ व्यतित व्हावा, एकटेपणा जाणवू नये व विरंगुळा मिळावा या उद्देशानेही अनेक ज्येष्ठ नागरिक बारामतीच्या या ज्येष्ठ नागरिक निवासात आवर्जून येत असतात.

तीन वेळेसचा चहा, सकाळचा गरमागरम नाश्ता, दोन वेळेसचे पौष्टिक भोजन जोडीला असल्याने आणि तांदुळवाडी येथील ही जागा निवांतपणाचा अनुभव देणारी असल्याने येथे ज्येष्ठांचा वेळ लीलया निघून जातो. समवयस्कांसोबत दैनंदिन गप्पा, सुख दुःख वाटून घेतली जातात, त्याने सर्वांनाच एक वेगळा दिलासा मिळत राहतो.

किशोर मेहता व अभय शहा परिवाराच्या वतीने अगदी प्रारंभापासूनच या निवासासाठी मदतीचा हात देऊ केला आहे.

तब्बल 27 लाखांच्या दोन उत्तम इमारती विनामूल्य उभारल्या गेल्या व शामराव राऊत यांनी स्ट्रक्चरल डिझाईन विनामूल्य केले. अनेक दानशूरांचे हात या उपक्रमास लागल्याने ज्येष्ठांची संध्याकाळ अधिक सुखद होण्यासाठी मदत झाली आहे.

दरम्यान आगामी काळात सर्वच उत्पन्न गटातील ज्येष्ठांच्या सोयीसाठी आणखी काही करता येणे शक्य आहे का या बाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूतोवाच केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT