पुणे

बारामतीत बहाद्दराची झडती घेतली अन् सापडले...

मिलिंद संगई

बारामती : शहरातील बारामती हॉस्पिटलमागील बाजूस का युवकाकडून शहर पोलिसांनी लोखंडी गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार संजय जगदाळे, रुपेश साळुंके, सुहास लाटणे, दशरथ इंगवले, योगेश कुलकर्णी, तुषार चव्हाण, अकबर शेख, संदीपान माळी, अनिल सातपुते, गोपाळ ओंबासे, अनिल सातपुते, दादासाहेब डोईफोडे, अंकुश दळवी, बंडू कोठे हे गस्त घालत असताना त्यांना बारामती हॉस्पिटलच्या मागे रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतिक भालचंद्र शिंदे (वय 25, रा. हरिकृपानगर, बारामती) हा संशयास्पद पध्दतीने वावरताना सापडला. 

त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला पिस्तूल आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या पूर्वी त्याला दोन पिस्तूल बाळगल्याप्रकरणीच अटक करण्यात आली होती व तो जामिनावर सुटला होता. पुन्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडल्याने पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून तपास सुरु करण्यात आला आहे. प्रतिक शिंदे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी एकट्या बारामतीत पोलिसांनी वीस पिस्तूल जप्त केले होते. नवीन वर्षातील हे पहिले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात शस्त्रांसह वावरण्याचे प्रमाण वाढणे ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही शस्त्र शोधासाठीही पोलिसांना सूचना दिल्या आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT