पुणे

coronavirus: आजपासून बारामतीकरांची खरी परिक्षा! 

सकाळवृत्तसेवा

बारामती - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांची खरी परिक्षा आता सुरु झाली आहे. शहरातील एका भाजीविक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आता भाजीपाला, फळे, चिकन, मटण, मासळी यांची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी काल रात्री उशीरा हे आदेश जारी केले. 

शहरात 30 मार्च रोजी कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर शहरातील भिगवण रस्त्यानजिकचा सर्व भाग सील करण्यात आला होता. त्या नंतर 6 एप्रिल रोजी एका भाजीविक्रेत्या कुटुंबातील व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. भाजीविक्रीसाठी उडणारी नागरिकांची झुंबड हा अगोदरच शहरात चर्चेचा विषय होता, त्यात एका भाजीविक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्याला लागण झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत भाजी, फळांसह चिकन, मटण व मासळीबाजारालाही लॉकडाऊनच्य कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टसिंग पाळले जात नसल्याने अखेरचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेला.

दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत आता बारामतीतील फक्त औषधे, किराणा, शेतीपूरक तसेच दूधविक्रीचीच दुकाने सुरु राहणार आहेत. बारामती शहरातील भिगवण रस्त्यानजिकचा तसेच आता गुनवडी चौकापासून खालील बाजूचा भाग प्रशासनाने सील केल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे. 

शोधमोहिम सुरु......
दरम्यान ज्याला कोरोनाची बाधा झाली आहे, ती व्यक्ती गेले काही दिवस घराबाहेर पडलेली नव्हती, त्या मुळे त्या व्यक्तीला इतर कोणामुळे तरी बाधा झाली असावी, असा प्रशासनाचा कयास आहे, त्या दृष्टीने संबंधित व्यक्तीचे कुटुंबिय व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी बनविण्याचे काम सुरु होते. आज या संदर्भात प्रशासनाकडून या व्यक्तींना होम कोरोटांईन करण्यासह त्यांच्या तपासण्या करण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. 

घराबाहेर पडू नका....
नागरिकांनी कोरोनाची शक्यता विचारात घेता घराबाहेर पडू नका, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. पोलिसांची संख्या मर्यादीत असल्याने नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे व आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT